श्रीनिवासन यांच्यासाठी ‘बीसीसीआय’चे दबावतंत्र
By Admin | Updated: June 9, 2014 04:15 IST2014-06-09T04:15:38+5:302014-06-09T04:15:38+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याच महिन्यात मेलबोर्न येथे होणाऱ्या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून निलंबित झालेल्या एन. श्रीनिवासन यांना आयसीसीचा अध्यक्ष करण्यासाठी दबावतंत्र अवलंबले आहे.

श्रीनिवासन यांच्यासाठी ‘बीसीसीआय’चे दबावतंत्र
हैदराबाद : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याच महिन्यात मेलबोर्न येथे होणाऱ्या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून निलंबित झालेल्या एन. श्रीनिवासन यांना आयसीसीचा अध्यक्ष करण्यासाठी दबावतंत्र अवलंबले आहे. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाच्या इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या वादग्रस्त पुनर्स्थापनेवर सहमती होण्याआधी त्यांच्यातून वेगळे होण्याची धमकीही बीसीसीआयने दिली आहे.
श्रीनिवासन यांना इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचा अध्यक्ष बनण्याविषयीच्या दबावतंत्राविषयीचे प्रकरण एमसीजीच्या २३ जून रोजी होणाऱ्या वार्षिक संमेलनात चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. न्यायालयाद्वारे निलंबित झाल्यानंतर श्रीनिवासन यांचा अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा घेतलेला निर्णय जास्त घाईत घेण्यात आला आहे. श्रीनिवासन यांना आयपीएलमध्ये सट्टेबाजी प्रकरणानंतर न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्षपदावरून निलंबित केले होते. आॅस्ट्रेलियन क्रिकेटचे अध्यक्ष वॅली एडवर्ड यांनी गत महिन्यात श्रीनिवासन यांच्याशी संपर्क साधला होता; परंतु श्रीनिवासन यांनी आपण आपल्या पवित्र्यावर कायम असल्याचे म्हटले होते.
बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले, या महिन्याअखेर भारत आयसीसीच्या महत्त्वपूर्ण पदावर असेल. आता त्यांच्यावर न्यायालयाची कोणतीही बंदी नाही. आम्ही दोघेही मेलबोर्नला जात आहोत. गत चार महिन्यात आम्ही सर्व आयसीसी सदस्यांबरोबरचे सर्व मुद्दे सोडवले आहेत. (वृत्तसंस्था)
आणि त्यांना आयसीसीच्या नव्या आर्थिक मॉडेल आणि रूपरेषेविषयी निश्चिंत केले आहे. मीडियाने आमच्यावर खूप टीका केली आहे आणि याच्याशी आम्ही बऱ्याच वेळा सहमत नव्हतो; परंतु जर भारताला योग्य रक्कम आणि प्रस्ताव मिळाला नसल्यास भारताला स्वत: दुसरी आयसीसी स्थापन करण्यासाठी बाध्य व्हावे लागू शकते. (वृत्तसंस्था)