बीसीसीआयचे लखपती समालोचक
By Admin | Updated: April 7, 2016 13:57 IST2016-04-07T13:45:11+5:302016-04-07T13:57:19+5:30
यशस्वी क्रिकेटपटू होता आले नाही तरी, निदान यशस्वी समालोचक बनण्याची अनेकांची इच्छा असते. कारण टीव्हीवर सामना सुरु असताना त्यात रंग भरण्याचे काम समालोचक करत असतात.

बीसीसीआयचे लखपती समालोचक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - यशस्वी क्रिकेटपटू होता आले नाही तरी, निदान यशस्वी समालोचक बनण्याची अनेकांची इच्छा असते. कारण टीव्हीवर सामना सुरु असताना त्यात रंग भरण्याचे काम समालोचक करत असतात. बीसीसीआयकडून समालोचनासाठीही घसघशीत वेतन दिले जाते. एका दौ-यामध्ये तुम्ही लखपती होता.
संजय मांजरेकरचेच उदहारण घ्या ना. बीसीसीआयच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार जानेवारी २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका दौ-यावरील समालोचनासाठी त्याला ३६,४९,३७५ इतकी घसघशीत रक्कमेचे मानधन मिळाले. या दौ-यात चार कसोटी सामने होते. दिवसाच्या आधारावर बीसीसीआयकडून हे वेतन दिले जाते. चार कसोटी सामने होते त्यामुळे त्याला प्रत्येक दिवसासाठी ३ लाख ४ हजार रुपये मिळाले.
दुस-याबाजूला दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी अनिल कुंबळेला समालोचनासाठी ३९,१०,५०० इतकी रक्कम मिळाली. यात पाच एकदिवसीय आणि चार कसोटींचा समावेश होता. क्रिकेट समालोचक दिवसाला दोन ते अडीच लाखाची कमाई करतात.
बीसीसीआय इतकी रक्कम देते म्हणून दुसरे बोर्डही इतकी रक्कम देत नाही. प्रत्येक बोर्डानुसार ही रक्कम बदलत जाते. समालोचकाची पात्रता , अनुभव यावर ही रक्कम ठरते.