दिवस-रात्र कसोटीसाठी बीसीसीआयचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 03:25 IST2016-05-13T03:25:31+5:302016-05-13T03:25:31+5:30
पुढील वर्षीच्या सुरुवातीला आॅस्टे्रलियाच्या भारत दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रस्ताव दिल्याचे क्रिकेट आॅस्टे्रलियाचे

दिवस-रात्र कसोटीसाठी बीसीसीआयचा प्रस्ताव
मेलबोर्न : पुढील वर्षीच्या सुरुवातीला आॅस्टे्रलियाच्या भारत दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रस्ताव दिल्याचे क्रिकेट आॅस्टे्रलियाचे (सीए) मुख्य कार्यकारी जेम्स सदरलैंड यांनी सांगितले. विशेष म्हणजे बीसीसीआयने आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी खेळणार असल्याची घोषणा केलेली असतानाच, सदरलैंड यांनी ही माहिती दिली.
सदरलैंड यांनी सांगितले, की माझ्या मते भारत आणि इतर ठिकाणी दिवस-रात्र कसोटीबाबत निश्चितपणे काही सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. सांकेतिक रूपाने त्यांनी आमच्यासह दिवस- रात्र कसोटी खेळण्याच्या संभावनाविषयी बोलण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी आॅस्टे्रलिया फेब्रुवारी व मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर जाणार असून, खरंच ही बाब अत्यंत सकारात्मक आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आॅस्टे्रलिया व न्यूझीलंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळविण्यात आला होता. (वृत्तसंस्था)