नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०१३-१४ या वर्षासाठी प्राप्तिकराच्या रूपात ५० कोटी रुपये भरले. खर्चाबाबतच्या मासिक खुलाशानंतर ही माहिती मिळाली आहे. अधिकृत संकेतस्थळावर २५ लाखांहून अधिक खर्चाची माहिती देताना बीसीसीआयने हासुद्धा खुलासा केला, की त्यांनी सेवाकराच्या रूपात २.७४ कोटी भरले आहेत. भारताच्या १९ वर्षांखालील ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना त्याची अर्धी रक्कम देण्यात आली, जी १ कोटी ३० लाख रुपये होती. यासोबतच आसाम क्रिकेट संघटनेला २०१४-१५ या वर्षासाठी वार्षिक देय रकमेच्या रूपात ३ कोटी ३७ लाख रुपये देण्यात आले आहेत. अशा प्रकारे बंगाल क्रिकेट संघटनेला वार्षिक देय रकमेच्या रूपात ६ कोटी ७५ लाख रुपये देण्यात आले. तर, वादात अडकलेल्या दिल्ली क्रिकेट संघटनेला २३ वर्षांखालील सी. के.नायडू आणि बाद फेरी सामन्यांच्या आयोजनासाठी २९.२२ लाख रुपये परत करण्यात आले.
बीसीसीआयने भरला ५० कोटींचा कर
By admin | Updated: April 13, 2016 02:25 IST