आॅक्टोबरपर्यंत बीसीसीआयची नवी कार्यकारिणी : राय
By Admin | Updated: May 12, 2017 07:00 IST2017-05-12T07:00:14+5:302017-05-12T07:00:14+5:30
सीओएप्रमुख विनोद राय यांच्या अनुसार त्यांची कार्यकारिणी येत्या आॅक्टोबरपर्यंत ‘व्यक्तीकेंद्रीत’ बीसीसीआयला साचेबद्ध संघटनेत बदलणार आहे.

आॅक्टोबरपर्यंत बीसीसीआयची नवी कार्यकारिणी : राय
नवी दिल्ली : सीओएप्रमुख विनोद राय यांच्या अनुसार त्यांची कार्यकारिणी येत्या आॅक्टोबरपर्यंत ‘व्यक्तीकेंद्रीत’ बीसीसीआयला साचेबद्ध संघटनेत बदलणार आहे. आर. एम. लोढा समितीच्या सुधारणांना लागू करण्यासाठी सीओएसाठी आॅक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
राय यांनी समितीच्या १०० दिवस पूर्ण झाल्याप्रित्यर्थ बोलताना सांगितले, ‘आता कमी वेळ राहिला आहे. याचा अंत आॅक्टोबरमध्ये होईल. मी यतार्थवादी आहे कारण मला सीओएसाठी बीसीसीआयमध्ये बराच काळ कोणतेही पद दिसत नाही. आम्ही बीसीसीआयमध्ये नसलेली पद्धत देऊ इच्छितो. व्यक्तीकेंद्री पद्धतीने सध्या काम चालविले जात आहे. आम्ही अशी संरचना करीत आहोत, ज्यामुळे ही पद्धत काम करेल. राय यांच्या अनुसार समन्वय आणि चर्चा पुढे नेण्याची एक पद्धत आहे. (वृत्तसंस्था)