बीसीसीआय सुधारित
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:42+5:302015-02-16T21:12:42+5:30
ईडीची बीसीसीआय,आयपीएलला नोटीस

बीसीसीआय सुधारित
ई ीची बीसीसीआय,आयपीएलला नोटीसमुंबई : २००९ मध्ये आयपीएल मीडिया अधिकार अफरातफरीत फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बीसीसीआय, आयपीएलचे अधिकारी आणि खासगी मल्टिमीडिया फर्मला नोटीस बजावली आहे. या सर्वांवर ४२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. या प्रकरणी ज्यांना नोटीस बजावण्यात आली, त्यात बीसीसीआयचे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन, तत्कालीन आयपीएल आयुक्त ललित मोदी, सीओओ सुंदर रमण यांच्यासह वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप (डब्ल्यूएसजी)आणि मल्टी स्क्रीन मीडिया (एमएसएम) यांचा समावेश आहे. या सर्वांवर मीडिया अधिकार देताना अफरातफर केल्याचा आणि अवैध व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमवारी आयपीलएच्या आठव्या पर्वाचा लिलाव सुरू असताना ईडीने ही कारवाई केली, हे विशेष. बीसीसीआयने २००८ साली डब्ल्यूएसजी या कंपनीला ९१८ मिलियन अमेरिकन डॉलर रकमेच्या मोबदल्यात दहा वर्षांचे मीडिया अधिकार बहाल केले होते. त्याच वर्षी डब्ल्यूएसजीने एमएसएमशी करार करीत सोनीला अधिकृत ब्रॉडकास्टर बनविले. वर्षभरानंतर हा करार बदलण्यात येऊन नऊ वर्षांचा करण्यात आला. त्यापोटी मल्टी स्क्रीनने १.६३ बिलियन अमेरिकन डॉलर मोजले होते. एमएसएम ही सिंगापूरची तसेच डब्ल्यूएसजी ही मॉरिशस येथील कंपनी आहे. ईडीने २००९ साली या व्यवहाराची फेमा (परकीय चलन विनिमय) कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली. एमएसएमने डब्ल्यूएसजीला ४२५ कोटी रुपये सुविधा शुल्कापोटी अवैधरीत्या दिल्याचा आरोप आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम करारातील अटीनुसार बीसीसीआयला मिळाली नसून अवैध लाभार्थ्र्यांना पोहोचली. प्रसारण कराराशी संलग्न असलेल्या सर्वच अधिकार्यांची साक्ष नोंदविल्यानंतर ईडीने नोटीस बजावली आहे. ४५ दिवसांच्या आत सर्वांनी अपील करावे, असे ईडीच्या नोटिशीत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)