नरेनच्या ‘आॅफ स्पिन’वर बीसीसीआयची बंदी
By Admin | Updated: April 30, 2015 01:34 IST2015-04-30T01:34:02+5:302015-04-30T01:34:02+5:30
वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन याच्यावर आयपीएलसह बीसीसीआयच्या सर्वच सामन्यांत आॅफ स्पिन गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात आली.

नरेनच्या ‘आॅफ स्पिन’वर बीसीसीआयची बंदी
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन याच्यावर आयपीएलसह बीसीसीआयच्या सर्वच सामन्यांत आॅफ स्पिन गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात आली. भविष्यात आॅफ स्पिन केल्यास निलंबनास सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम देखील देण्यात आला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या या जादूई गोलंदाजाला दोन बोटांच्या जोडातून टाकण्यात येणारा चेंडू तसेच वेगवान सरळ चेंडू टाकण्यास मात्र सूट देण्यात आली. २२ एप्रिल रोजी केकेआर आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पंचांनी नरेनच्या संशयित गोलंदाजी शैलीची तक्रार केली होती. यानंतर त्याच्या शैलीचे बायोमेकॅनिकल परीक्षण झाले. बीसीसीआयच्या संशयित गोलंदाजी परीक्षण समितीने या केंद्राचा अहवाल आणि सामन्याचे फुटेज बघितल्यानंतर नरेन आॅफ स्पिन करतेवेळी क्रिकेट नियम २४.२चा भंग करीत असल्याचा निष्कर्ष काढला.
नरेन केकेआरकडून चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध खेळला नव्हता. पुढील सामन्यातही त्याच्या खेळण्याविषयी शंका आहे. (वृत्तसंस्था)
नरेन केकेआरकडून चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध खेळला नव्हता. पुढील सामन्यातही त्याच्या खेळण्याविषयी शंका आहे. भविष्यात तो आयपीएल सामने खेळला आणि आॅफ स्पिन चेंडू टाकल्यास ते ‘नो बॉल’ ठरविण्यात येतील. शिवाय त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. नरेनने सामन्यात आॅफ स्पिन टाकल्यास मैदानी पंच ते नो बॉल देतील; शिवाय सामना संपल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.