बीसीसीआयची एजीएम अनिश्चित काळासाठी स्थगित
By Admin | Updated: September 14, 2015 00:34 IST2015-09-14T00:34:46+5:302015-09-14T00:34:46+5:30
बीसीसीआयची कोलकातामध्ये २७ सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली.

बीसीसीआयची एजीएम अनिश्चित काळासाठी स्थगित
नवी दिल्ली : बीसीसीआयची कोलकातामध्ये २७ सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बैठकीत सहभागी होण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची बोर्डाला प्रतीक्षा आहे. श्रीनिवासनबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरच एजीएमबाबत निर्णय होईल.
बैठकीला केवल १४ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे आता बैठक स्थगित होणार असल्याचे मानल्या जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बीसीसीआयला आपल्या सदस्यांना कार्यसमितीच्या अंतिम बैठकीनंतर किमान तीन आठवड्यांचा कालावधीत देणे आवश्यक आहे. त्यानंतरच एजीएम आयोजित करता येईल.
बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे
अध्यक्ष म्हणून श्रीनिवासन यांना बोर्डाच्या बैठकीमध्ये सहभागी होता येईल किंवा नाही, याबाबत माहिती मागितली आहे. गेल्या आठवड्यात कोलकातामध्ये झालेली बोर्डाच्या कार्यसमितीची बैठक श्रीनिवासन यांच्या उपस्थितीमुळे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करावी लागली होती.
(वृत्तसंस्था)