बजरंगला रौप्य तर नरसिंगला कांस्य
By Admin | Updated: September 30, 2014 01:17 IST2014-09-30T01:17:24+5:302014-09-30T01:17:24+5:30
कुस्तीमध्ये 61 किलो वजनगटात बजरंग कुमारने प्रतिस्पध्र्याविरुद्ध पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार पुनरागमन करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले.

बजरंगला रौप्य तर नरसिंगला कांस्य
>इंचियोन : कुस्तीमध्ये 61 किलो वजनगटात बजरंग कुमारने प्रतिस्पध्र्याविरुद्ध पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार पुनरागमन करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम फेरीत त्याला इराणच्या महमूदविरुद्धच्या संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय कुस्तीगिरांनी भारताच्या पदकांमध्ये भर घातली. नरसिंग यादवने पुरुषांच्या 74 किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक पटकाविण्यात यश मिळविले. महाराष्ट्राला हे यश तब्बल 52 वर्षानंतर मिळाले. भारताने कुस्तीत पाच पदकांची कमाई केली आहे. बजरंग व नरसिंग यांनी फ्री-स्टाईलमध्ये भारताच्या मोहिमेची शानदार सांगता केली. भारताने यात पाच पदके पटकाविली. बजरंगला अंतिम लढतीत मसूदविरुद्ध 1-3 ने पराभव स्वीकारावा लागला. नरसिंगने कांस्यपदकाच्या लढतीत जपानच्या दाइसुके शिमादाचा 3-1 ने पराभव केला. त्याआधी, पवन कुमारला 86 किलो वजनगटात रेपेशेज लढतीत पराभव स्वीकारावा लागला.