या फलंदाजाने वनडेत ठोकले त्रिशतक
By Admin | Updated: May 26, 2017 07:07 IST2017-05-26T06:47:07+5:302017-05-26T07:07:12+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या रोहित शर्माचा एक विक्रम मोडित निघाला आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात वनडेमध्ये केलेल्या 266 धावा तुम्हाला आठवत असतीलच.

या फलंदाजाने वनडेत ठोकले त्रिशतक
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 26 - मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात एक जून पासून होत आहे. क्रिकेट रसिक आतुरतेने याची वाट पाहत आहेत. चॅम्पिन्स ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पडणार यात काही दुमत नाही. पण या चॅम्पिन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या रोहित शर्माचा एक विक्रम मोडित निघाला आहे. रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात वनडेमध्ये केलेल्या 266 धावा तुम्हाला आठवत असतीलच. पण हिटमॅन रोहित शर्माचा हा विक्रम पाकिस्तानच्या एका खेळाडूने मोडला आहे. बिलाल इरशाद अहमद या पाकिस्तानच्या खेळाडूने वनडेमध्ये त्रिशतक ठोकले आहे.
बिलाल इरशाद अहमदने 175 चेंडूचा सामना करताना 320 धावांची मॅरेथॉन खेळी केली आहे. बिलालने इंटर क्लब क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये ही खेळी केली आहे. बिलालने आपल्या या खेळीदरम्यान 9 षटकार आणि 42 चौकार लगावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून हे कोणी केलेलं नाही. पण 200 धावांचा टप्पा मात्र गाठला गेला आहे. भारताचा रोहितने शर्मा, सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सहवाग यांनी वनडेत द्विशतकी खेळी केली आहे. तसेच क्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांचा देखील समावेश आहे.