बत्रा, रामचंद्रन आयओएकडून सन्मानित
By Admin | Updated: December 24, 2016 01:05 IST2016-12-24T01:05:16+5:302016-12-24T01:05:16+5:30
भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) नवनियुक्त अध्यक्ष बरिंदर बत्रा आणि आपले

बत्रा, रामचंद्रन आयओएकडून सन्मानित
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) नवनियुक्त अध्यक्ष बरिंदर बत्रा आणि आपले अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना शुक्रवारी आॅलिम्पिक भवन येथे सन्मानित केले.
सोहळ्याच्या प्रारंभी आयओएचे अध्यक्ष रामचंद्रन यांनी बत्रा यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. त्यानंतर आयओए महासचिव राजीव मेहता यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्रन यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित केले.
आॅलिम्पिकमधील योगदानासाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी) आणि आशियाई आॅलिम्पिक समिती (ओसीए) यांनीदेखील नुकतेच रामचंद्रन यांना सन्मानित केले होते.
यावर्षी आॅगस्टमध्ये रिओ आॅलिम्पिकदरम्यान आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी रामचंद्रन यांना ‘आॅलिम्पिक आॅर्डर’ पुरस्काराने सन्मानित केले होते, तर २ महिन्यांनंतर ओसीएने त्यांना आशियामधील खेळात असलेल्या भरीव योगदानासाठी प्रतिष्ठित ‘ओसीए अवॉर्ड आॅफ मेरिट’ प्रदान केला होता.
रामचंद्रन म्हणाले, ‘मी मोठ्या अंतराने एफआयएच निवडणूक जिंकल्याबद्दल बत्रा यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी जागतिक पातळीवर आणखी प्रगती करील याचा मला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)