बनावट सर्टिफिकेटच्या आधारे अधिक वयाचे बॅडमिंटनपटू खेळविले
By Admin | Updated: November 12, 2014 00:37 IST2014-11-12T00:37:14+5:302014-11-12T00:37:14+5:30
आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे कोच आणि कर्नाटक बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विमल कुमार यांच्यावर अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट सर्टिफिकेटच्या आधारे अधिक वयाचे बॅडमिंटनपटू खेळविले
बेंगळुरु : आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे कोच आणि कर्नाटक बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विमल कुमार यांच्यावर अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट सर्टिफिकेटच्या आधारे अधिक वयाचे बॅडमिंटनपटू कमी वयोगटात खेळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
इंडियन बॅडमिंटन लीगच्या पहिल्या पर्वात डॅनियल फहिद याने 19 वर्षे गटात बंगा बिट्सचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या बनावट सर्टिफिकेट्सच्या आधारे तो 15 वर्षे गटात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर विमल आणि केबीएचे सचिव भास्कर राज ऊर्स यांच्याविरुद्ध बेंगळुरु पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेंगळुरुमध्येच पोलीस उपायुक्त संदीप पाटील यांनी तक्रार आल्याच्या वृत्तास दुजोरा देत सांगितले की,‘ खेळाडूची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर त्याच्याकडे ज्या वयाची सर्टिफिकेट आहेत ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले.’
फहीदसह अन्य काही खेळाडूंना भारतीय बॅडमिंटन संघटनेने बनावट सर्टिफिकेटबाबत इशारा देखील दिला होता. त्यानंतरही केबीएने या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची परवानगी बहाल केली. तक्रराकत्र्याने सर्व खेळाडूंवर बंदी घालवण्याची मागणी करीत सांगितले की, गतवर्षी महासंघाने सर्वच खेळाडूंची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर वयाचे सर्टिफिकेट बनावट असल्याप्रकरणी दोषी धरले होते. आपली बाजू मांडताना विमल कुमार म्हणाले,‘ बनावट सर्टिफिकेट प्रकरणी आरोप असलेल्या खेळाडूंनी महासंघाच्या कारवाईवर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांची प्रमाणपत्रे योग्य ठरविल्यानंतर महासंघाने खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली. खेळाडूंकडे लिव्हिंग सर्टिफिकेट्स, पासपोर्ट आहेत. वैद्यकीय अहवालात शंभर टक्के सत्यता नसते. म्हणूनच कारवाई करु शकत नाही.’ (वृत्तसंस्था)