बारी यांची व्यवस्थापक, निवडकर्तेपदी निवड होणार
By Admin | Updated: October 25, 2014 22:42 IST2014-10-25T22:42:36+5:302014-10-25T22:42:36+5:30
कराची :

बारी यांची व्यवस्थापक, निवडकर्तेपदी निवड होणार
क ाची : पाकिस्तानचे माजी कसोटी कर्णधार वसीम बारी राष्ट्रीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक अथवा पुनश्च मुख्य निवडकर्ते बनण्यासाठी प्रबळ दावेदाराच्या रुपात समोर आले आहेत़ यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने कोणालाही मंडळात दुहेरी पदावर राहण्यासाठी मान्यता न देण्याचा निर्णय घेतला आह़े पीसीबीच्या विश्वसनीय सूत्रानुसार, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स (बीओजी) ने लाहोरमध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत दुहेरी भूमिकेमुळे हितसंबंध बिघडण्याची स्थिती निर्माण होत असल्याकारणाने याला मान्यता न देण्याचा निर्णय घेण्यात आला़ दरम्यान मंडळामध्ये अनेक माजी खेळाडू अन्य अधिकारी दुहेरी पदावर आहेत़ त्यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण माजी कसोटी कर्णधार मोईन खान आहे जो राष्ट्रीय संघाचा कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता आह़े