रशियाच्या वेटलिफ्टिंग पथकावर बंदी
By Admin | Updated: July 30, 2016 20:38 IST2016-07-30T20:38:39+5:302016-07-30T20:38:39+5:30
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने रिओत ५ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी रशियाच्या वेटलिफ्टिंग पथकावर डोपिंगमुळे बंदी घातली आहे

रशियाच्या वेटलिफ्टिंग पथकावर बंदी
>ऑनलाइन लोकमत -
मास्को, दि. 30 -: आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने रिओत ५ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी रशियाच्या वेटलिफ्टिंग पथकावर डोपिंगमुळे बंदी घातली आहे. विश्व डोपिंगविरोधी संस्थेने(वाडा) रशियाच्या खेळाडूंना डोपिंगमध्ये दोषी धरले होते. याच कारणास्तव संपूर्ण संघाला रिओत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली.
रशियाने वारंवार वेटलिफ्टिंग खेळाचे नुकसान केले तसेच या खेळाची प्रतिष्ठा धुळीस मिळविली. याच कारणामुळे रशियाच्या खेळाडूंना सहभागी करून घ्यायचे नाही, असा आंतरराष्ट्रीय संघटनेने निर्णय घेतला आहे. दरम्यान रशियाचे क्रीडामंत्री विताली मुत्को यांनी दिलेल्या माहितीनुसार रिओसाठी निवडण्यात आलेल्या पथकातील ३८७ पैकी २७२ खेळाडूंना परवानगी मिळाली आहे. ट्रॅक अॅन्ड फिल्ड खेळाडूंना आधीच प्रतिबंधित करण्यात आले
आहे.