बांग्लादेशी क्रिकेटर शहादत तुरुगांत
By Admin | Updated: October 5, 2015 19:00 IST2015-10-05T18:59:16+5:302015-10-05T19:00:16+5:30
बांग्लादेशचा २९ वर्षीय जलद गोलंदाज शहादतला हुसैनला आज ढाका योथील स्थानिक कोर्टाने तुरुगांत धाडण्याचे आदेश दिले, त्याच्यावर घरातील ११ वर्षाच्या सहायीकेस मारपिट आणि उत्पीडीत करण्याचा आरोप होता

बांग्लादेशी क्रिकेटर शहादत तुरुगांत
>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. ५ - बांग्लादेशचा २९ वर्षीय जलद गोलंदाज शहादत हुसैनला आज ढाका योथील स्थानिक कोर्टाने तुरुगांत धाडण्याचे आदेश दिले, त्याच्यावर घरातील ११ वर्षाच्या सहायीकेस मारपिट आणि उत्पीडीत करण्याचा आरोप होता. एक महिन्यापूर्वी त्याच्यावर हा आरोप लागल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर त्याने कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. आज कोर्टाने त्याचा जमानत अर्ज ही फेटाळला आणि पुढील तारखेपर्यंत शहादतला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहादतच्या वकिलाने बचाव करताना कोर्टास सांगितले की, हा आपल्या देशाचा खेळाडू असून राष्ट्रीय हिरो आहे. बांग्लादेश क्रिकेटला संघाला आणि देशाला गरज आहे. तरी जमानत मिळावी. परंतु, कोर्टाने याचिका फेटाळली आणि शहादतला पोलिस कोठडी सुणावली.
शहादतने बांग्लादेश कडून ३८ कसोटी आणि ५१ एकदिवसीय सामने खेळलेला आहे. त्याच्यावर घरातील ११ वर्षाच्या सहायीकेस मारपिट आणि उत्पीडीत करण्याचा आरोप झाल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट मंडळाने निलंबित केले आहे.