बांगलादेशाला कमकुवत समजू नये : गांगुली
By Admin | Updated: March 18, 2015 23:33 IST2015-03-18T23:33:05+5:302015-03-18T23:33:05+5:30
भारतीय संघाने बांगलादेश संघाला कमकुवत समजू नये. त्यांनी इग्लंड संघाला घरचा रस्ता दाखविला आहे. भारतीय संघाची प्रत्येक बाजू वरचढ आहे.

बांगलादेशाला कमकुवत समजू नये : गांगुली
मेलबोर्न : भारतीय संघाने बांगलादेश संघाला कमकुवत समजू नये. त्यांनी इग्लंड संघाला घरचा रस्ता दाखविला आहे. भारतीय संघाची प्रत्येक बाजू वरचढ आहे. या स्पर्धेत भारताने प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली या संघाने गत विश्वचषकासह टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स चषक जिंकले असल्याचे मत माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.
मुख्य म्हणजे क्रिकेट असा खेळ आहे, की मैदानावर केव्हा काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे भारतीय संघाने सावधगिरी बाळगून खेळावे, असे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने वृत्तसंस्थेला सांगितले.