शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

बांगलादेशने केली इंग्लंडची शिकार

By admin | Updated: March 17, 2015 23:52 IST

बांगलादेश वर्ल्डकपमध्ये येतो तोच मुळी प्रस्थापितांना हुसकावून लावण्यासाठी. २००७साली त्यांनी भारताला वर्ल्डकपमधून साखळी फेरीतच बाहेर काढलं.

काही मुलं जन्मजात उपद्रवी असतात, तसं बांगलादेशचं आहे. बांगलादेश वर्ल्डकपमध्ये येतो तोच मुळी प्रस्थापितांना हुसकावून लावण्यासाठी. २००७साली त्यांनी भारताला वर्ल्डकपमधून साखळी फेरीतच बाहेर काढलं. यंदा त्यांनी जगाला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडला ‘शाळा’ शिकविली. अखेरच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत बांगलादेशने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ७ बाद २७५ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडचा डाव ४८.३ षटकांत २६० धावांत गुंडाळला. या विजयाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशने आपला प्रवेश निश्चित केला, तर इंग्लंडला स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला. साखळी फेरीतील हा सर्वांत धक्कादायक निकाल झाला असे म्हणता येईल. रुबेल हुसेन : बांगलादेशचा जलदगती गोलंदाज रुबेल हुसेनने या सामन्यात ५४ धावा देत ४ बळी घेतले. त्याने इयान बेल आणि कर्णधार मोर्गन यांना एकाच षटकात बाद करून बांगलादेशच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मोक्याच्या क्षणी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनाही पाठोपाठ बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केले. मोहम्मद महमुदुल्ला : विश्वकप स्पर्धेत शतकी खेळी करणारा महमुदुल्ला बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला. शतकी खेळीत ७ चौकार व एका षट्काराचा समावेश आहे. विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशकडून मोहम्मद महमुदुल्लाने १०३ ही सर्वाेच्च धावसंख्या या सामन्यात नोंदविली. यापूर्वी तमिम इक्बालने स्कॉटलंडविरुद्ध ९५ धावांची खेळी केली होती. मुशफकिर रहीम : मोहम्मद महमुदुल्लाचा साडूभाऊ असलेला मुशफकिर रहीमने महमुदुल्लाला चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४४ चेंडूंमध्ये १४१ धावांची भागीदारी केली.सहापैकी तीन : गेल्या सहा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाला तीन वेळा साखळीतच गारद व्हावे लागले. चारपैकी तीन : बांगलादेश संघाने इंग्लंडचा गेल्या चार एकदिवसीय लढतींमध्ये केलेला हा तिसरा पराभव ठरला.