बांगरने केली रोहितची पाठराखण
By Admin | Updated: August 9, 2015 22:47 IST2015-08-09T22:47:22+5:302015-08-09T22:47:22+5:30
टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्टार फलंदाज रोहित शर्माची पाठराखण केली आहे. कसोटीत ३०० पेक्षा जास्त धावा करायच्या असतील, तर रोहितला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे गरजेचे आहे

बांगरने केली रोहितची पाठराखण
कोलंबो : टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्टार फलंदाज रोहित शर्माची पाठराखण केली आहे. कसोटीत ३०० पेक्षा जास्त धावा करायच्या असतील, तर रोहितला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे गरजेचे आहे.
रोहितने श्रीलंका बोर्ड एकादश विरोधात दोन्ही डावांत मिळून १५ धावा केला. बांगर म्हणाले, की तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणे हे रोहित आणि टीम इंडियासाठी चांगले आहे. ज्या प्रकारे सध्याचा संघ खेळतोय. त्यात संघाला एका दिवसात ३०० पेक्षा जास्त धावा करणे गरजेचे आहे. आणि
रोहितमध्ये ती क्षमता आहे. तो संघासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे, की रोहित तिसऱ्या क्रमांकावरच खेळेल. मात्र, सराव सामन्यातील त्याच्या खेळीने संघाची ही रणनीती कामी येईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बांगर म्हणाले, की रोहित अनुभवी खेळाडू आहे आणि बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय.(वृत्तसंस्था)