बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

By Admin | Updated: April 9, 2017 03:53 IST2017-04-09T03:53:21+5:302017-04-09T03:53:21+5:30

केदार जाधवच्या ६९ धावानंतर अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचा १५ धावांनी पराभव केला.

Bangalore's Royal Tournament | बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय

बंगळुरू : केदार जाधवच्या ६९ धावानंतर अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचा १५ धावांनी पराभव केला.
१५८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. ऋषभ पंत (५७), बिलिंग्ज (२५), आदित्य तारे (१८), सॅमसन (१३) यांनी शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. दिल्लीचा संघ १४२ धावा करू शकला. रॉयल चॅलेंजर्सकडून स्टॅन्लेक, अब्दुल्ला, नेगी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. चहल, मिल्स आणि वॅटसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी केदार जाधवच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हीलविरूद्ध ८ बाद १५७ धावा केल्या.
जाधवने ३७ चेंडूत पाच
षटकार आणि पाच चौकारांच्या सहाय्याने ६९ धावा केल्या. त्याने स्टुअर्ट बिन्नी (१६) सोबत चौथ्या विकेटसाठी ६.२ षटकांत ६६ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरू : २० षटकांत ८ बाद १५७. (केदार जाधव ६९, शेन वॅटसन २४, स्टुअर्ट बिन्नी १६, पवन नेगी १०, जहीर खान २/३१, मॉरिस ३/२१, कमिन्स १/२९, नदीम १/१३)
दिल्ली डेअरडेव्हील्स : २० षटकांत ९ बाद १४२. (बिलिंग्ज २५, ऋषभ पंत ५९, आदित्य तारे १८, सॅमसन १३, स्टॅन्लेक २/२९, अब्दुल्ला २/३६, नेगी २/३, मिल्स १/३३, वॅटसन १/१२).

Web Title: Bangalore's Royal Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.