बांदोडकर क्रिकेट चषक मंगळवारपासून
By Admin | Updated: April 10, 2015 23:29 IST2015-04-10T23:29:57+5:302015-04-10T23:29:57+5:30
पणजी : गोव्यातील प्रतिष्ठेची बांदोडकर क्रिकेट लीग चषक स्पर्धा येत्या मंगळवारपासून (दि.१४) पणजी जिमखाना मैदानावर खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील. त्यांना दोन गटात विभागण्यात आले आहे. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. स्पर्धेत साळगावकर, धेंपो, चौगुले, काकुलो, जिनो आणि सर्वोदया क्लबचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी (दि.१४) चौगुले आणि धेंपो यांच्यात होणार आहे. हा सामना पणजी जिमखाना मैदानावर होईल. काही सामने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होतील. (क्रीडा प्रतिनिधी)

बांदोडकर क्रिकेट चषक मंगळवारपासून
प जी : गोव्यातील प्रतिष्ठेची बांदोडकर क्रिकेट लीग चषक स्पर्धा येत्या मंगळवारपासून (दि.१४) पणजी जिमखाना मैदानावर खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील. त्यांना दोन गटात विभागण्यात आले आहे. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. स्पर्धेत साळगावकर, धेंपो, चौगुले, काकुलो, जिनो आणि सर्वोदया क्लबचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी (दि.१४) चौगुले आणि धेंपो यांच्यात होणार आहे. हा सामना पणजी जिमखाना मैदानावर होईल. काही सामने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होतील. (क्रीडा प्रतिनिधी)