रशियाच्या पाच खेळाडूंवर बंदी
By Admin | Updated: January 22, 2015 00:21 IST2015-01-22T00:21:15+5:302015-01-22T00:21:15+5:30
तीन आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यासह पाच रशियन रेसवॉकर्सवर रशियाच्याच डोपिंगविरोधी एजन्सीने बंदी घातली आहे़

रशियाच्या पाच खेळाडूंवर बंदी
मॉस्को : तीन आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यासह पाच रशियन रेसवॉकर्सवर रशियाच्याच डोपिंगविरोधी एजन्सीने बंदी घातली आहे़
आॅलिम्पिक चॅम्पियन सर्जेई किर्दीयापकिन आणि ओल्गा कनिस्किना यांच्या व्यतिरिक्त २०११ मध्ये विश्व चॅम्पियन राहिलेल्या सर्जेई बकुलिन याच्यावर तीन वर्षे २ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे़ या तिघांवरही २०१२ मध्ये डोपिंगचा आरोप लावण्यात आला होता़ दरम्यान, किरदियापकिन २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार आहे़ कारण तोपर्यंत त्याच्यावरील बंदी संपणार आहे़ बीजिंग आॅलिम्पिक २००८ मध्ये सुवर्णपदक विजेता वालेरी बोर्चिनवर ८ वर्षांचा आणि व्लादिमिर कनायकिन याच्यावर आजीवन बंदी लावण्यात आली आहे़ त्यांच्या रक्ताच्या नमुन्यात प्रतिबंधक औषधांचे समावेश आढळला. त्यानंतर आरयूएएसडीएने आपल्या अनुशासन समितीबरोबर या खेळाडूंबाबत चर्चा केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली गेली. किर्दीयापकिनने २०१२ लंडन आॅलिम्पिक स्पर्धेत ५० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत सुवर्ण जिंकले होते. (वृत्तसंस्था)