बालाजीची एकेरी, दुहेरीत विजयी सलामी

By Admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:17+5:302014-08-27T21:30:17+5:30

चंदीगढ: द्वितीय सीडेड भारताच्या एऩ र्शीराम बालाजीने चीनच्या ताईपेमध्ये सुरु असलेल्या 15 हजार डॉलर बक्षिसाच्या पुरुष टेनिस स्पर्धेच्या एकेरी आणि दुहेरीच्या लढती जिंकून आपल्या अभियानाची सुरुवात विजयाने केली़ बालाजीने एकेरीत पहिल्या राऊंडमध्ये ताईपेच्या वेई डी लीनला सलग सेटमध्ये 6-2, 6-1 ने हरवल़े तर टॉप सीडेड भारतीय जोडी बालाजी आणि रंजीत विराली मुरुगेसन यांनी दुहेरीच्या पहिल्या राऊंडमध्ये मसातो शिगा आणि को सुझुकी या जपानी जोडीचा 6-2, 6-2 ने सलग सेटमध्ये पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला़ दरम्यान, सागर मंजाना आणि सूरज आर प्रबोध यांना दुहेरीच्या पहिल्या फेरीत चीनी जोडी येकोंग हे आणि यू झाँगकडून 6-7, 3-6 ने पराभवाला सामोरे जावे लागल़े

Balaji's singles, doubles championship win | बालाजीची एकेरी, दुहेरीत विजयी सलामी

बालाजीची एकेरी, दुहेरीत विजयी सलामी

दीगढ: द्वितीय सीडेड भारताच्या एऩ र्शीराम बालाजीने चीनच्या ताईपेमध्ये सुरु असलेल्या 15 हजार डॉलर बक्षिसाच्या पुरुष टेनिस स्पर्धेच्या एकेरी आणि दुहेरीच्या लढती जिंकून आपल्या अभियानाची सुरुवात विजयाने केली़ बालाजीने एकेरीत पहिल्या राऊंडमध्ये ताईपेच्या वेई डी लीनला सलग सेटमध्ये 6-2, 6-1 ने हरवल़े तर टॉप सीडेड भारतीय जोडी बालाजी आणि रंजीत विराली मुरुगेसन यांनी दुहेरीच्या पहिल्या राऊंडमध्ये मसातो शिगा आणि को सुझुकी या जपानी जोडीचा 6-2, 6-2 ने सलग सेटमध्ये पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला़ दरम्यान, सागर मंजाना आणि सूरज आर प्रबोध यांना दुहेरीच्या पहिल्या फेरीत चीनी जोडी येकोंग हे आणि यू झाँगकडून 6-7, 3-6 ने पराभवाला सामोरे जावे लागल़े
0000000000000000000000000000000000
शॉन टेट वन-डेमध्ये पुनरागमन करणार
सिडनी: एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेतलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट पुनश्च वन-डेमध्ये परती करू इच्छितोय़ टेटने 2011 विश्वकपनंतर वन-डे क्रिकेटमधून संन्यास घेतला होता़ त्यानंतर तो गेल्या तीन वर्षांपासून केवळ टी-20 क्रिकेट खेळत होता; मात्र आता तो आपल्या कारकिर्दीच्या समाप्तीपूर्वी देशासाठी आणखी क्रिकेट खेळून विजय मिळवून देऊ इच्छितोय़ 2007-08 मध्ये त्याने कसोटीमधून निवृत्ती घेतली होती़ टी-20 क्रिकेटमध्ये सक्रीय शॉन यावर्षी ऑक्टोबरमध्ये मेटाडोर बीबीक्यू वन-डे कपच्या चार सामन्यांमध्ये खेळणार आह़े 31 वर्षीय शॉन म्हणाला, मी साऊथ ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी कटिबद्ध आह़े कारण मला असे वाटते की राज्यालादेखील याची गरज आह़े
000000000000000000000000000000000
झिम्बाब्वेचा पैनयंगारा वन-डे मालिकेतून बाहेर
केपटाऊन: झिम्बाब्वेने तिरंगी मालिकेसाठी संघातून आपला वेगवान गोलंदाज तिनाषे पैनयंगाराला बाहेर केले आह़े त्याच्यावर अनुशासनहिनतेचा आरोप आह़े या मालिकेमध्ये झिम्बाब्वेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आह़े पैनयंगाराला देशातील अ संघासोबत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे आणि त्याच्यावर सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातील संपूर्ण रकमेचा दंड सुनावण्यात आला आह़े
000000000000000000000000000000000000000000000
माजी भारतीय कोच कस्र्टनने केली ट्रॅव्हल फर्मची स्थापना
मुंबई: दक्षिण आफ्रिकन क्रिकेटर गॅरी कस्र्टन यांनी एक ट्रॅव्हल अँड टूर्स कंपनीची स्थापना करून एका नव्या डावाची सुरुवात केली आह़े कस्र्टन यांनी एक कोच म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 2011 क्रिकेट विश्वकप मिळवून दिले होत़े कस्र्टन यांनी दक्षिण आफ्रिकेमधील केप आफ्रिका टूर्ससोबत मिळून गॅरी कस्र्टन ट्रॅव्हल अँड टूर्स कंपनीची स्थापना केली़ त्यांनी केप टाऊन आणि डरबनमध्ये आपल्या क्रिकेट अकॅडमीमध्ये कोचिंगच्या मागणीनंतर हा निर्णय घेतला़
00000000000000000000000000000000000
पटियालामधील हॉकी टर्फ धोकादायक नाही:थॉमसन
नवी दिल्ली: हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स मॅनेजर रॉलेंट ऑल्टमेंन्स यांनी भलेही एनआयएस पटियालाच्या हॉकी टर्फला धोकादायक आणि महिला संघाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील तयारीसाठी अडथळा असल्याचे म्हटले असले तरी भारतीय खेळ प्राधिकरणचे असे म्हणणे आहे की पिचमध्ये किरकोळ खराबी असून, ते एक अथवा दोन दिवसांमध्ये दुरुस्त होईल़ साईचे महासंचालक जिजी थॉमसन यांनी आज मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्हाला हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स संचालक रॉलेंट ओल्टमेन्स यांचे पत्र मिळाले आह़े आम्ही येथे विशेष तज्ज्ञांना पाठविले असून, ते एक अथवा दोन दिवसात पीच व्यवस्थित करतील़ ही गंभीर बाब नाही़

Web Title: Balaji's singles, doubles championship win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.