बजरंग होणार फोगाट कुटुंबाचा जावई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 06:25 IST2019-08-09T01:55:11+5:302019-08-09T06:25:05+5:30
टोकिओ ऑलिम्पिक आटोपताच विवाह बंधनात अडकणार

बजरंग होणार फोगाट कुटुंबाचा जावई
भिवानी : कुस्तीच्या विश्वक्रमवारीत नंबर वन असलेला मल्ल बजरंग पुनिया हा प्रसिद्ध फोगाट कुटुंबाचा जावई होणार आहे. आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांचा मानकरी असलेल्या फोगाट भगिनींमधील धाकटी संगीता फोगाट हिच्यासोबत बजरंग टोकिओ ऑलिम्पिक आटोपताच विवाह बंधनात अडकणार आहे.
संगीता ५९ किलो वजन गटाची राष्ट्रीय चॅम्पियन आहे. दोघांचा विवाह कुटुंबाच्या संमतीने होत आहे. संगीताहून मोठी असलेली बबिता फोगाट हिचे लग्न मल्ल विवेक सुहाग याच्यासोबत ठरले आहे. बजरंग सध्या ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त आहे. संगीतादेखील राष्ट्रीय शिबिरात असून जखमेतून सावरत आहे. विवाहाच्या वृत्ताला संगीताचे वडील आणि कोच महावीर फोगाट यांनीही दुजोरा दिला.