बजाज क्रीडा महोत्सव
By Admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:51+5:302014-08-16T22:24:51+5:30
के.सी. बजाज शालेय क्रीडा महोत्सव २० पासून

बजाज क्रीडा महोत्सव
क .सी. बजाज शालेय क्रीडा महोत्सव २० पासूनव्हॉलिबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, नेमबाजी, बुद्धिबळ, तिरंदाजीचे आयोजननागपूर : सिंधू शिक्षण संस्थेचे संस्थापक के. सी. बजाज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित शालेय क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ यंदा २० ऑगस्टपासून जरिपटका येथील महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूल मैदानावर होणार आहे. यंदा आयोजनाचे हे नववे वर्ष असून मुलामुलींसाठी आयोजित ता महोत्सवात व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, नेमबाजी, बुद्धिबळ आणि तिरंदाजी स्पर्धा होतील, अशी माहिती संस्थेचे सचिव दीपक बजाज यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.यंदा व्हॉलिबॉलमध्ये मुलांचे ३२ आणि मुलींचे १६, बास्केटबॉलमध्ये मुलांचे १६ आणि मुलींचे आठ संघ सहभागी होत असून स्केटिंग प्रकारात ९०० तसेच बुद्धिबळात २५० स्पर्धकांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आणि खेळाडूंना चषक तसेच उत्कृष्ट खेळाडूंनाही चषक देण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट प्रशिक्षकाला देखील गौरविण्याची परंपरा कायम राहणार आहे. या महोत्सवात एकाच मैदानावर शंभर शाळांमधून तीन हजारावर सहभागी स्पर्धकांना दररोज अल्पोपहार आणि इतर सुविधा आयोजन समितीमार्फत पुरविण्यात येणार आहेत. शासनाच्या शालेय क्रीडा आयोजनापूर्वी हा महोत्सव होत असल्याने खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरण मिळण्यास लाभ होतो, असे बजाज म्हणाले.पुढील वर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोचचा देखील आम्ही महोत्सवादरम्यान सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवाची सांगता आणि पुरस्कार वितरण २ सप्टेंबर रोजी होईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूला पाहुणा म्हणून बोलविण्याची इच्छा बजाज यांनी व्यक्त केली.पत्रपरिषदेला संस्थेच्या अध्यक्ष वीणा बजाज, हरकिशन राजपाल, के. एल. बजाज, प्रजापती बजाज, खुबचंद प्रितमानी, टेकचंद ग्यानचंदानी, ज्योती दुहिलानी, राजकुमारी मेघराजानी आदी उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)