शिवाजी विद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा
By Admin | Updated: September 1, 2014 21:34 IST2014-09-01T21:34:01+5:302014-09-01T21:34:01+5:30
शिवाजी महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा

शिवाजी विद्यालयात बॅडमिंटन स्पर्धा
श वाजी महाविद्यालयात बॅडमिंटन स्पर्धाआकोट : स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय आकोट येथे ३० व ३१ ऑगस्ट रोजी शारिरीक शिक्षण व संगीत विभाग यांचे संयुक्त विद्यमाने बॅडमिंटन ओपन स्पर्धा पार पडली.उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास तायडे होते.स्पर्धेचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्टच्या अकोट शाखेचे व्यवस्थापक संदीप चौरेसिया यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे संचालक प्रा. अण्णासाहेब तायडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विश्वास वसू यांनी आपले विचार मांडलेत. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रफुल्ल देशमुख यांनी केले. स्पर्धेत एकूण ३५ स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलेमध्ये प्रतिक कात्रे प्रथम, स्वप्निल सपकाळ द्वितीय राहिला. १९ वर्षाखालील मुलींमधून प्रथम प्रगती ओलोकार, द्वितीय स्थानावर वैष्णवी महाजन आली. १९ वर्षावरील गटातून मुलांमधून प्रथम पंकज गोरे, द्वितीय सुरज लाकडे, वरिष्ठ मुलींमधुन प्रथम क्रमांकावर पायल देशमुख तर द्वितीयस्थानी श्रुष्टी वानखडे जिंकली. कार्यक्रमाकरिता प्रा. पवित्रकार यांचे व सर्व खेळाडुंचे कार्यक्रम यशस्वितेकरिता सहभाग रााहिला. (तालुका प्रतिनिधी)