बॅडमिंटन

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:20+5:302015-01-23T23:06:20+5:30

सय्यद मोदी बॅडमिंटन :

Badminton | बॅडमिंटन

बॅडमिंटन

्यद मोदी बॅडमिंटन :
सायना, सिंधू व श्रीकांत उपांत्य फेरीत
लखनौ : भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन ग्रांप्रि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीमध्ये श्रीकांतने अंतिम चारमध्ये स्थान मिळविले.
बीबीडी अकादमी कोर्टवर खेळल्या गेलेल्या लढतीत अव्वल मानांकित सायनाने मायदेशातील सहकारी अरुंधती पानतावणेचा २१-८, २१-१७ ने परभव करीत उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सायनाने प्रतिस्पर्धी अरुंधतीला वर्चस्व गाजविण्याची संधी दिली नाही. ३४ मिनिटे रंगलेल्या या लढतीत अरुंधतीने झुंज दिली, पण अनुभवी सायनाचे आव्हान मोडून काढण्यात ती अपयशी ठरली.
तिसऱ्या मानांकित पी.व्ही. सिंधूने निर्णायक गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत थायलंडच्या प्रोन्टिप बरानप्रासेत्सुकची झुंज ८-२१, २१-११, २१-१४ ने मोडून काढली. सिंधूला उपांत्य फेरीत स्पेनची विश्व चॅम्पियन व दुसरे मानांकन प्राप्त कॅरोलिन मरिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मरिनने थायलंडच्या चोचुव्होंग पोर्नपाव्हीचा २१-११, २१-१३ ने पराभव केला. चौथ्या मानांकित थायलंडच्या निचाओन जिंदापोनने भारताच्या पीसी तुलसीचा २१-१६, २०-२२, २१-१२ ने पराभव केला. जिंदापोनला उपांत्य फेरीत सायनाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
पुरुष एकेरीमध्ये भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने उपांत्य फेरी गाठली. प्रतिस्पर्धी मलेशियाचा व्हेई फेंग चोंगने स्नायूच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे श्रीकांतचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला.

Web Title: Badminton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.