बॅडमिंटन
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:52+5:302015-01-23T01:03:52+5:30
सय्यद मोदी बॅडमिंटन : अरुंधती पानतावणेची आगेकूच

बॅडमिंटन
स ्यद मोदी बॅडमिंटन : अरुंधती पानतावणेची आगेकूचसायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीतलखनौ : भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू व अव्वल मानांकित सायना नेहवालसह दुसरे मानांकन प्राप्त स्पेनची कॅरोलिन मारिस व तिसरे मानांकन प्राप्त पी.व्ही. सिंधू यांनी आज सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. लखनौ बीबीडी बॅडमिंटन अकादमीमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत पुरुष विभागात अव्वल मानांकित श्रीकांत व पारुपल्ली कश्यप यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय खेळाडूंनी आज वर्चस्व गाजविले. बिगरमानांकित अरुंधती पानतावणेने पाचव्या मानांकित स्पेनच्या बीट्रिज किरालिसचा २२-२०, २२-२० ने पराभव करीत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीमध्ये बिगरमानांकित भारतीय जोडी मन्नू अत्री व मनीषा यांनी दुसऱ्या मानांकित सिंगापूरच्या डेनी बावा क्रिसनाटा व यु यान वरीना यांचा २३-२१, २१-१९ ने पराभव केला. उपउपांत्यपूर्व फेरीत अव्वल मनांकित सायना नेहवालने रितुपर्णा दासचा २१-१५, २१-१९ ने तर दुसऱ्या मानांकित स्पेनच्या कॅरोनिल मारिनने संघर्षपूर्ण लढतीत तन्वी लाडचा २१-२३, २१-१९, २१-६ ने पराभव केला. तिसऱ्या मानांकित पी.व्ही. सिंधूने सिंगापूरच्या जियायुवान चेनचा २१-१८, २१-१४ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)