भारतीय संघासाठी वाईट बातमी, चेेतेश्वर पुजारा आजारी.

By Admin | Updated: October 2, 2016 18:53 IST2016-10-02T18:53:29+5:302016-10-02T18:53:29+5:30

भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा फ्लूमुळे आजारी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात आज तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात

Bad news for Cheteshwar Pujara sick of India | भारतीय संघासाठी वाईट बातमी, चेेतेश्वर पुजारा आजारी.

भारतीय संघासाठी वाईट बातमी, चेेतेश्वर पुजारा आजारी.

>गुणवंत चौधरी/ऑनलाइन लोकमत
 
कोलकाता : भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा फ्लूमुळे आजारी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात आज तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात नव्हता. पुजाराचा आजार गंभीर नसून तो दुस-या डावात तिस-या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याचे संघाच्या नजीकच्या सूत्राने सांगितले. 
 
पुजारा फ्ल्यूमुळे आजारी असून सावधगिरी म्हणून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, असेही सूत्रांनी सांगितले. पुजाराने पहिल्या डावात भारतातर्फे सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली होती. 
 
पुजाराच्या स्थानी आज गौतम गंभीर व उमेश यादव यांनी न्यूझीलंडच्या डावादरम्यान वेगवेगळ्या वेळी क्षेत्ररक्षण केले.

Web Title: Bad news for Cheteshwar Pujara sick of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.