संघ निवडीसाठी पर्याय उपलब्ध: लक्ष्मण
By Admin | Updated: April 20, 2017 20:41 IST2017-04-20T20:41:50+5:302017-04-20T20:41:50+5:30
सनरायजर्स हैदराबाद संघात अनेक खेळाडूंचा भरणा असल्याने संघ निवडताना पर्याय उपलब्ध असल्याबद्दल संघाचे मेंटर व्हीव्हीएस लक्ष्मण आनंदी

संघ निवडीसाठी पर्याय उपलब्ध: लक्ष्मण
>
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 20 - सनरायजर्स हैदराबाद संघात अनेक खेळाडूंचा भरणा असल्याने संघ निवडताना पर्याय उपलब्ध असल्याबद्दल संघाचे मेंटर व्हीव्हीएस लक्ष्मण आनंदी आहेत. हैदराबादने काल दिल्लीवर १५ धावांनी विजय नोंदविताच गुणतालिकेत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकाविले. सामन्यानंतर लक्ष्मण म्हणाले,‘सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रयत्न असल्यामुळे चिंतेचे कुठलेही कारण
नाही. आमच्या नव्या चेहºयांकडून भक्कम कामगिरी होत असल्याने परिस्थितीनुरुप संघ निवड केली जाते. कुठल्याही एका फलंदाज किंवा गोलंदाजांवर विसंबून राहावे लागत असल्याची चिंता नाही. अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान याच्या कामगिरीवर मी फारच खूष आहे.’