आॅस्ट्रेलियाचे ‘स्मिथ’ हास्य
By Admin | Updated: July 18, 2015 00:30 IST2015-07-18T00:30:48+5:302015-07-18T00:30:48+5:30
स्टीव्हन स्मिथच्या (२१५) दुहेरी शतकाच्या बळावर आॅस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत १८४ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात ५६६ धावांवर डाव घोषित केला.

आॅस्ट्रेलियाचे ‘स्मिथ’ हास्य
लंडन : स्टीव्हन स्मिथच्या (२१५) दुहेरी शतकाच्या बळावर आॅस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत १८४ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात ५६६ धावांवर डाव घोषित केला. यानंतर इंग्लंडची सुरूवात खराब झाली़ दिवसाअखेर त्यांची अवस्था ४ बाद ८५ अशी बिकट झाली होती़
एक बाद ३३७ धावांवरून पुुढे खेळताना सलामीचा ख्रिस रॉजर्स १७३ धावा काढून बाद झाला. त्याने ३०० चेंडूंचा सामना करीत २८ चौकार ठोकले. तर स्टीव्हन स्मिथने २१५ धावांचे योगदान देताना ३४६ चेंडूत २५ चौकार व एक षटकार ठोकला. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी २८४ धावांची भागीदारी केली.