आॅस्ट्रेलियाचे लक्ष्य मालिका विजय
By Admin | Updated: December 26, 2015 02:55 IST2015-12-26T02:55:37+5:302015-12-26T02:55:37+5:30
वेस्ट इंडिजविरुद्ध आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया संघ विजयासह आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. होबार्टच्या पहिल्या कसोटीत

आॅस्ट्रेलियाचे लक्ष्य मालिका विजय
मेलबोर्न : वेस्ट इंडिजविरुद्ध आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया संघ विजयासह आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. होबार्टच्या पहिल्या कसोटीत तीन दिवसांत आॅस्ट्रेलियाने विंडीजचा डावाच्या फरकाने पराभव केला होता.
‘बॉक्सिंग डे टेस्ट’ अशी ओळख असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी धडाकेबाज फलंदाज उस्मान ख्वाजा याचा आॅस्ट्रेलिया संघात
समावेश करण्यात आला. शॉन मार्शची जागा फॉर्ममध्ये असलेला ज्यो बर्न्स घेईल.
मागच्या सामन्यात शतक झळकविणारा मार्श अपयशी ठरला. त्याला दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नाही. फॉर्ममध्ये असलेली डेव्हिड वॉर्नर- ज्यो बर्न्स या सलामी जोडीला प्राधान्य देण्याचा कठीण निर्णय निवड समितीला घ्यावा लागला. यामुळेच स्कॉट बोलॅन्ड याला अद्यापही पदार्पणाची संधी देण्यात आली नाही.
गोलंदाजीत पीटर सिडल आणि जेम्स पॅटिन्सन हे पूर्णपणे फिट आहेत. वेगवान मारा जोश हेजलवूड सांभाळेल. दुसरीकडे पहिली कसोटी गमाविणाऱ्या वेस्ट इंडिजचा युवा कर्णधार जेसन होल्डर याने
मागचा पराभव विसरून आॅस्ट्रेलियाला टक्कर देण्यास संघ सज्ज असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या सामन्यासाठी शेनोन गॅब्रियलऐवजी कार्लोस ब्रेथवेट याला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलिया सध्या १-० ने आघाडीवर आहे. (वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
आॅस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ज्यो बर्न्स, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, अॅडम वोग्स, मिशेल मार्श, पीटर नेव्हिल, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल, जोस हेजलवूड आणि नाथन लियॉन.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, राजेंद्र चंद्रिका, डेरेन ब्राव्हो,सॅमुअल्स, जर्मन ब्लॅकवूड, दिनेश रामदीन, कार्लोस ब्रेथवेट,केमर रोच, जेरोम टेलर, जोमेल वॉरिकेन.