आॅस्ट्रेलियाचा संघ ‘ब्रॉड’ संकटात

By Admin | Updated: August 7, 2015 01:58 IST2015-08-06T23:06:19+5:302015-08-07T01:58:23+5:30

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने गुरुवारी आपल्या घातक माऱ्याने आॅस्ट्रेलियन दिग्गज फलंदाजांचा अक्षरश: ‘मर्डर’ केला. त्याने अवघ्या १५ धावांत

Australian team 'Broad' in trouble | आॅस्ट्रेलियाचा संघ ‘ब्रॉड’ संकटात

आॅस्ट्रेलियाचा संघ ‘ब्रॉड’ संकटात

नॉटिंगहॅम : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने गुरुवारी आपल्या घातक माऱ्याने आॅस्ट्रेलियन दिग्गज फलंदाजांचा अक्षरश: ‘मर्डर’ केला. त्याने अवघ्या १५ धावांत ८ गडी बाद केल्याने चौथ्या अ‍ॅशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारापूर्वीच पाहुणा संघ १८.३ षटकांच्या खेळात केवळ ६० धावांत गारद झाला. यानंतर इग्लंडने पहिल्या डावात चहापानापर्यंत २९ षटकांत ३ बाद ९९ अशी मजल मारुन ३९ धावांची आघाडी घेतली आहे.
इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याने नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आॅस्ट्रेलियाला ब्रॉडने पहिल्याच षटकांत धक्का दिला. सलामीवीर ख्रिस रॉजर्स (०) आणि स्टीव्हन स्मिथ (६) हे बाद झाल्यापासून पाहुणा संघ सावरू शकला नाही. यापाठोपाठ ब्रॉडने शॉन मार्श (०), अ‍ॅडम व्होग्स (१), कर्णधार क्लार्क (१०), मिशेल जॉन्सन (१३) आणि नाथन लियॉन (९) यांनादेखील परतवले. मार्क वुड याने डेव्हिड वॉर्नर (०) आणि स्टीव्हन फिन याने यष्टिरक्षक नेव्हिले (२) यांना टिपले. जो रुटने तीन आणि कूकने दोन झेल टिपले. वुडने तीन षटकंत १३ धावांत एक व फिनने सहा षटकांत २१ धावांत एक गडी बाद केला.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडने आत्मविश्वासाने खेळताना आॅसीला दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅडम लीथने पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कला चौकार ठोकून संघाचे इरादे स्पष्ट केले. लीथ आणि कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने सावध सुरुवात करत आॅसीला सुरुवातीच्या यशापासून दूर ठेवले. मात्र स्टार्कने सामन्यात रंग भरताना लीथ आणि हुकमी फलंदाज इयान बेल यांना एका षटकाच्या फरकाने बाद करुन यजमानांची २ बाद ३४ अशी अवस्था केली. कुक-रुट यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी करुन संघाला आघाडी मिळवून दिली.

टे्रंडब्रीज स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाहुण्या आॅस्टे्रलियाचा कर्दनकाळ ठरलेल्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने यावेळी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आपल बळींचे त्रिशतक पुर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील २९वा आणि इंग्लंडचा पाचवा गोलंदाज ठरला. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर आपल्या तिसऱ्याच चेंडुवर ब्रॉडने ख्रिस रॉजर्सला बाद करुन आपला ३०० वा बळी मिळवला.

६० आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावा. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा आॅसींची ही सातवी कमी धावसंख्या आहे. ७९ वर्षातील दुसरी कमी धावसंख्या. या आधीची कमी धावसंख्या ४७, २०११मध्ये दक्षिण अफ्रि केविरोधात.
२५ चेंडूत आॅस्ट्रेलियाने पहिले पाच गडी गमावले. २००२ नंतर कोणत्याही संघाने एवढ्या कमी चेंडूत पाच गडी गमावले नव्हते.
१११ चेंडूत आॅस्ट्रेलियाचा डाव संपला. याआधी १९३६ मध्ये ९९ चेंडूत आॅस्ट्रेलियाचा डाव आटोपला होता. कमी चेंडूच्या डावात १४ पैकी १३ डाव इंग्लंड विरोधात आहेत.
२ स्टुअर्ट ब्रॉड याने पहिल्या षटकातच दोन गडी बाद केले. २००२ नंतर ही कामगिरी याआधी इरफान पठाण (२००६ विरोधी संघ पाकिस्तान) आणि ख्रिस केर्न्स (विरोधी संघ इंग्लंड २००२ ).
० ख्रिस रॉजर्स शुन्यावर बाद होण्याची ही पहिली वेळ.
४६ डावांत एकदाही रॉजर्स शुन्यावर बाद झाला नव्हता.
५ इंग्लडकडून ३०० पेक्षा जास्त बळी घेणारे गोलंदाज. स्टुअर्ट ब्रॉड हा पाचवा गोलंदाज आहे. या आधी जेम्स अँडरसन (४१३), इआन बोथम (३८३), बॉब विल्स (३२५), फ्रेड ट्रुमन (३०७) यांनी ही कामगिरी केली आहे.

05
वेळा आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या ४ फलंदाजांपैकी ३ फलंदाज शुन्यावर बाद झाले. रॉजर्स(०), वॉर्नर (०), स्मिथ (०), शॉन मार्श (०). पाचही वेळा आघाडीचे फलंदाज
इंग्लंड विरोधातच बाद झालेत. अशी वेळ याआधी १९५० मध्ये ब्रिस्बेन येथे आली होती.
धावफलक
आॅस्टे्रलिया (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स झे. कुक गो. ब्रॉड ०, डेव्हीड वॉर्नर झे. बटलर गो. वुड ०, स्टिव्ह स्मिथ झे. रुट गो. ब्रॉड ६, शॉन मार्श झे. बेल गो. ब्रॉड ०, मायकल क्लार्क झे. कुक गो. ब्रॉड १०, अ‍ॅडम वोगेस झे. स्टोक्स गो. ब्रॉड १, पीटर नेव्हील त्रि. गो. फीन २, मिचेल जॉन्सन झे. रुट गो. ब्रॉड १३, मिचेल स्टार्क झे. रुट गो. ब्रॉड १, जोश हेजलवूड नाबाद ४, नॅथन लियॉन झे. स्टोक्स गो. ब्रॉड ९. अवांतर - १४. एकूण : १८.३ षटकांत सर्वबाद ६० धावा. गोलंदाजी : स्टुअर्ट ब्रॉड ९.३ -५-१५-८; मार्क वुड ३-०-१३-१; स्टिव्ह फीन ६-०-२१-१. इग्लंड (पहिला डाव) : अ‍ॅडम लीथ झे. नेव्हील गो. स्टार्क १४, अ‍ॅलिस्टर कूक पायचीत गो. स्टार्क ४३, इयान बेल पायचीत गो. स्टार्क १, जो रुट खेळत आहे ३३, जॉनी बेरस्टो खेळत आहे २. अवांतर - ६. एकूण : २९ षटकांत ३ बाद ९९.

(वृत्तसंस्था)

Web Title: Australian team 'Broad' in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.