ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया मिर्झाचा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

By Admin | Updated: January 25, 2017 13:04 IST2017-01-25T12:57:41+5:302017-01-25T13:04:04+5:30

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने तिचा क्रोएशियाचा जो़डीदार इव्हान डोडिंगसह ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

Australian Open: Sania Mirza's mixed doubles semifinal berth | ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया मिर्झाचा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया मिर्झाचा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

>ऑनलाइन लोकमत
मेलबोर्न, दि. २५ - भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने तिचा क्रोएशियाचा जो़डीदार इव्हान डोडिंगसह ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया व इव्हानने रोहन बोपण्णा आणि गॅब्रियल दाब्रोवास्की यांचा ६-४, ३-६, १२-१० असा पराबव केला. 
एकूण ६७ मिनिटे चाललेल्या या खेळात भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची कॅनडाची साथीदार गॅब्रियलने काही चांगल्या संधी गमावल्या. या पराभवासोबतच बोपण्णाचा नव्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमचा प्रवासही संपुष्टात आला आहे. दरम्यान सानिया आणि इव्हानचा पुढच्या फेरीत लिअँडर पेस आणि मार्टिना हिंगीस यांच्या जोडीविरुद्ध होऊ शकतो. 

Web Title: Australian Open: Sania Mirza's mixed doubles semifinal berth