ऑस्ट्रेलियन ओपन: सानिया, हिंगीस अंतिम फेरीत

By Admin | Updated: January 27, 2016 18:48 IST2016-01-27T18:46:45+5:302016-01-27T18:48:43+5:30

दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील भारताची अव्वल खेळाडू सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी आपला विजयी धडाका कायम राखताना ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Australian Open: Sania, Hingis in final round | ऑस्ट्रेलियन ओपन: सानिया, हिंगीस अंतिम फेरीत

ऑस्ट्रेलियन ओपन: सानिया, हिंगीस अंतिम फेरीत

>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २७ - दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील भारताची अव्वल खेळाडू  सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी आपला विजयी धडाका कायम राखताना ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या जोडीने जुलिया जॉर्जेस व कॅरोलिना प्लिस्कोवा या जोडीचा ६ - १, ६ - ० असा आरामात पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
जवळपास ७० मिनिटांपर्यंत चाललेल्या या लढतीत सानिया आणि हिंगीस यांना विजय मिळविण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. विजयी जोडीला आता अतिंम सामन्यात  ज्येक गणराज्यची आन्द्रिया लावाकोवा आणि लूसी रादेका यांच्याशी झुंज द्यावी लागेल.
सानिया आणि हिंगीसने सलग ३५ सामने जिंकत दबदबा निर्माण केला आहे. या दोघींनी गेल्या सत्रात अमेरिकन ओपन आणि विम्बल्डनचा किताब पटकाविला. या दोघींनी एका वर्षात ११ किताब जिंकले आहेत. ब्रिस्बेन आणि सिडनी आंतरराष्ट्रीय किताब जिंकून त्या आता आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकण्यासाठी खेळत आहेत. 

Web Title: Australian Open: Sania, Hingis in final round