रियो डि जेनेरिओ: आॅस्ट्रेलियाचा सायकलिस्ट रिची पोर्टेचा अपघातादरम्यान खांद्यांची हाडे मोडल्याने पुढील आठवड्यात रियो आॅलिम्पिकमध्ये होणाऱ्या टाईम ट्रायल सामन्यातून बाहेर पडला आहे. पोर्टे ३५ किमी प्रतितास वेगाने रस्त्यावरून खाली उतरत होता़ तेव्हा ही दुर्घटना घडली़ त्यावेळी २३७़५ किमीची रेस शिल्लक होती़ पोर्टे म्हणाला, मला माझे हात वर उचलता येत नाहीत़ मला बरे होण्यासाठी कमीत कमी दहा दिवस तरी लागतील़ अपघातावेळी एक जण समोर आला त्यामुळे मी वाचलो अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर बनली असती़.
आॅस्ट्रेलियन सायकलिस्ट पोर्टे ट्रायलला मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 21:38 IST