ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे सुधारीत बातमी
By Admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:28+5:302014-08-25T21:40:28+5:30
ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय

ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे सुधारीत बातमी
ऑ ्ट्रेलियाचा विक्रमी विजयतिरंगी मालिका : झिम्बाब्वे १९८ धावांनी पराभूत, मार्श, मॅक्सवेल, फिंच यांची अर्धशतके हरारे : मिशेल मार्श (८९), ग्लेन मॅक्वेल (९३), ॲरोन फिंच (६७) यांची अर्धशतके आणि गोलंदाजांची सुरेख गोलंदाजी या बळावर ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेतील पहिल्या वन-डे सामन्यात झिम्बाब्वेवर १९८ धावांनी विक्रमी विजय मिळविला़ ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३५१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले आणि नंतर झिम्बाब्वेचा डाव ३९़३ षटकांत १५२ धावांत गुंडाळून सामन्यात बाजी मारली़ झिम्बाब्वे कडून हॅमिल्टन मस्कजदा याने (७०) अर्धशतकी खेळी केली़ सिकंदर रजा याने ३३ धावांनी योगदान दिले़ या व्यतिरिक्त त्यांचा एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही़ ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्हन स्मिथ याने ३ गडी बाद केले, तर मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी २, तर मिशेल जॉन्सन आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी १ बळी मिळवीत संघाच्या विजयात योगदान दिले़ संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत एकूण ६ बाद ३५०़(ॲरोन फिंच ६७, ब्रॅड हॅडिन ४६, मिशेल मार्श ८९, ग्लेन मॅक्सवेल ९३़ तेंदई चतारा २/७७, सिन विलियम्स १/५९)़ झिम्बाब्वे : ३९़३ षटकांत सर्वबाद १५२़ ( हॅमिल्टन मस्कजदा ७०, सिकंदर रजा ३३़ स्टिव्हन स्मिथ ३/१६, मिशेल स्टार्क २/२३, नॅथन लियॉन २/४२)़