आॅस्ट्रेलियाने लंकेविरुद्धची मालिका जिंकली

By Admin | Updated: September 5, 2016 03:57 IST2016-09-05T03:57:38+5:302016-09-05T03:57:38+5:30

वॉर्नरच्या शानदार शतकाच्या जोरावर आॅस्टे्रलियाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्या श्रीलंकेला ५ विकेट्सने नमवले

Australia won the series against Sri Lanka | आॅस्ट्रेलियाने लंकेविरुद्धची मालिका जिंकली

आॅस्ट्रेलियाने लंकेविरुद्धची मालिका जिंकली


पल्लेकल : वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर कर्णधार डेव्हीड वॉर्नरच्या शानदार शतकाच्या जोरावर आॅस्टे्रलियाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्या श्रीलंकेला ५ विकेट्सने नमवले. या विजयासह आॅसीने ५ सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली.
श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. धनुष्का गुणतिलक (३९) आणि धनंजय डिसिल्वा (३४) यांनी सलामीसाठी ७३ धावांची भागीदारी केली, परंतु त्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळल्याने त्यांचा संघ ४0.२ षटकांत १९५ धावांमध्ये गारद झाला. स्टार्कने ४0 धावांत ३ गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करताना वॉर्नरने झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर आॅस्टे्रलियाने ४३ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १९९ धावा काढल्या. वॉर्नरने १२६ चेंडूत ९ चौकारांसह १०६ धावांची खेळी केली, तर जॉर्ज बेलीने ७३ चेंडूत २ चौकारांसह ४४ धावांची संयमी खेळी करून संघाच्या विजयात योगदान दिले. (वृत्तसंस्था)

Web Title: Australia won the series against Sri Lanka