आॅस्ट्रेलिया खेळणार स्कॉटलंडविरुद्ध!
By Admin | Updated: March 14, 2015 00:16 IST2015-03-14T00:16:50+5:302015-03-14T00:16:50+5:30
गेल्या दोन सामन्यांत सहज विजयासह विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा आॅस्ट्रेलिया संघ ‘ब’ गटात उद्या शनिवारी अखेरच्या साखळी सामन्यात

आॅस्ट्रेलिया खेळणार स्कॉटलंडविरुद्ध!
होबार्ट : गेल्या दोन सामन्यांत सहज विजयासह विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा आॅस्ट्रेलिया संघ ‘ब’ गटात उद्या शनिवारी अखेरच्या साखळी सामन्यात दुबळ्या स्कॉटलंडविरुद्ध काही दयामाया दाखविण्याच्या स्थितीत नाही.
आॅस्ट्रेलियाने आधीच्या सामन्यात लंकेवर ६४ धावांनी विजय साजरा केला. त्या सामन्यात ३७६ आणि त्यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ४१७ धावा उभारल्या होत्या. उद्या फलंदाजीची संधी मिळाल्यास पुन्हा एकदा धावांचा डोंगर उभारण्याची इच्छा असेल. सद्य:स्थितीनुसार आॅस्ट्रेलियाला उपांत्यपूर्व लढतीत पाकविरुद्ध खेळायचे आहे.
स्कॉटलंडविरुद्ध भक्कम संघ खेळविण्याचे संकेत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने दिले आहेत. चार वेगवान गोलंदाज खेळविण्यात येतील. स्पिनर झेव्हियर डोहर्टी याला विश्रांती देण्यात येणार असल्याचे क्लार्कने स्पष्ट केले. विश्वचषकात तिसऱ्यांदा सहभागी झालेल्या स्कॉटलंडने अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. आॅस्ट्रेलिया-स्कॉटलंड चार वेळा परस्परांविरुद्ध खेळले. आॅस्ट्रेलियाने चारही सामने मोठ्या फरकाने जिंकले हे विशेष. १९९९ मध्ये सहा गड्यांनी, २००५ मध्ये १८९ धावांनी, २००७ मध्ये २०३ धावांनी आणि २०११ मध्ये २०० धावांनी विजय साजरे केले होते. या संघाचा आॅलराऊंडर माजिद हक याला वर्णभेदी वक्तव्याबद्दल आधीच संघाबाहेर करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)