ऑस्ट्रेलिया वि. नेदरलँड, २-३ गोल का बदला गोल से
By Admin | Updated: June 19, 2014 06:38 IST2014-06-19T05:57:39+5:302014-06-19T06:38:32+5:30
ऑस्ट्रलिया आणि नेदरलँड सामन्यात गोल का बदला गोल से या तत्वाने नेदरलँड खेळत होती असे म्हणावे लागेल

ऑस्ट्रेलिया वि. नेदरलँड, २-३ गोल का बदला गोल से
ऑनलाइन टीम
बेरिआ रिओ, दि. १९ - ऑस्ट्रलिया आणि नेदरलँड सामन्यात गोल का बदला गोल से या तत्वाने नेदरलँड खेळत होती असे म्हणावे लागेल. पहिल्या भागात २० व्या मिनिटाला नेदरलँड च्या रॉबेनने गोल करताच पुढच्या मिनिटाला ऑस्ट्रलियाच्या टॉम काहिल ने गोल केला. पहिलाभाग संपायला काही मिनिटं शिल्लक असताना नेदरलँडचा ब्रुनो आपल्याच सह खेळाडूकडून जखमी झाला. दुस-या भागात ऑस्ट्रलियाच्या जेनडिनाक ने ५४ व्या मिनिटाला गोल केला असता ५८ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी संघाच्या पेर्सिने गोल केला आणि दोन्ही संघांचे गोल २-२ असे समान राहिले. ६७ व्या मिनिटाला ऑस्ट्रलियाच्या लिवी ने गोल करण्याचा प्रयत्न केला असता तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर लगेचच नेदरलँडच्या डिपे ने ६८ व्या मिनिटाला गोल करताच नेदरलँडच्या प्रेक्षकांनी जल्लोष केला. अधिक वेळेतील ३ मिनिटं ऑस्ट्रलियाने स्वतःचा बचाव करण्यात घालवली आणि ३-२ अशी मात करत नेदरलँडचा संघ विजयी झाला.