आॅस्ट्रेलिया ‘अ’ चा द. आफ्रिका संघावर १०८ धावांनी विजय

By Admin | Updated: August 13, 2015 04:08 IST2015-08-13T04:08:57+5:302015-08-13T04:08:57+5:30

कर्णधार मॅथ्यू वेडच्या शानदार शतकाच्या बळावर आॅस्ट्रेलिया अ संघाने बुधवारी द. आफ्रिका अ संघाचा १०८ धावांनी पराभव करीत तिरंगी वने डे मालिकेत विजयी घोडदौड कायम राखली.

Australia A South Africa beat by 108 runs | आॅस्ट्रेलिया ‘अ’ चा द. आफ्रिका संघावर १०८ धावांनी विजय

आॅस्ट्रेलिया ‘अ’ चा द. आफ्रिका संघावर १०८ धावांनी विजय

चेन्नई : कर्णधार मॅथ्यू वेडच्या शानदार शतकाच्या बळावर आॅस्ट्रेलिया अ संघाने बुधवारी द. आफ्रिका अ संघाचा १०८ धावांनी पराभव करीत तिरंगी वने डे मालिकेत विजयी घोडदौड कायम राखली.
नाणेफेक जिंकताच आॅस्ट्रेलिया अ ने ४७.२ षटकांत सर्वबाद २७२ पर्यंत मजल गाठली. प्रत्युत्तरात द. आफ्रिका अ संघ ३७.१ षटकांत १६४ धावांत गारद झाला.
कॅमेरुन बोएसने ४८ धावांत तीन आणि एस्टन एगरने ४१ धावांत तीन गडी बाद केले. त्यांना वेगवान गोलंदाज कूल्टर नाईलची साथ लाभली. नाईलने सात षटकांत आठ धावा देत दोन गडी बाद केले. आॅस्ट्रेलियाने स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. (वृत्तसंस्था)

वेडने १०६ चेंडूंवर नऊ चौकार व सात षटकारांसह १३० धावा ठोकल्या. यष्टिरक्षक फलंदाज पीटर हॅन्डरस्कॉम्बने ५२ धावांचे योगदान दिले. वेडने ज्यो बर्न्स(११) आणि ख्रिस लेन (२९) यांच्यासोबतही अर्धशतकी भागीदारी केली. सीनए बोटने २३ धावा केल्या.
द. आफ्रिकेकडून डावखुरा वेगवान गोलंदाज लोनवाबो सोत्सोबे याने ५० धावांत तीन गडी टिपले. द. आफ्रिकेच्या डावात कर्णधार डीन एल्गरने सर्वाधिक ६४ धावांचे योगदान दिले.

Web Title: Australia A South Africa beat by 108 runs