आॅस्ट्रेलियाने संघ बदलू नये: स्टीव्ह वॉ
By Admin | Updated: March 24, 2017 23:51 IST2017-03-24T23:51:30+5:302017-03-24T23:51:30+5:30
धरमशाला येथे आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत भारतावर दडपण असल्याने आॅस्ट्रेलियाने अंतिम एकादशमध्ये कुठलाही बदल करू नये,

आॅस्ट्रेलियाने संघ बदलू नये: स्टीव्ह वॉ
मेलबोर्न : धरमशाला येथे आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत भारतावर दडपण असल्याने आॅस्ट्रेलियाने अंतिम एकादशमध्ये कुठलाही बदल करू नये, असा मोलाचा सल्ला माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला दिला.
भारताला ही मालिका जिंकण्याची अपेक्षा असल्याने यजमानांवर दबाव आहे. भारत पराभूतदेखील होऊ शकतो. याचा लाभ घेण्यासाठी आॅस्ट्रेलिया संघात बदल करू नका. रांचीतील संघ येथेही कायम ठेवा. डेव्हिड वॉर्नर पुन्हा मोठी खेळी करेल यात शंका नाही. पॅट कमिन्स, शॉन मार्श आणि पीटर हॅण्डस्कोम्ब हे उपयुक्त खेळाडू असल्याने संघात उगाच बदल करण्यात अर्थ नसल्याचे वॉचे मत आहे. (वृत्तसंस्था)