आॅस्टे्रलियाची सामन्यावर मजबूत पकड
By Admin | Updated: November 7, 2015 03:16 IST2015-11-07T03:16:08+5:302015-11-07T03:16:08+5:30
उस्मान ख्वाजा आणि अॅडम वोग्स यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ओस्टे्रलियाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या दिवशी केवळ ४ फलंदाजांच्या मोबदरल्यात

आॅस्टे्रलियाची सामन्यावर मजबूत पकड
ब्रिस्बेन : उस्मान ख्वाजा आणि अॅडम वोग्स यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ओस्टे्रलियाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या दिवशी केवळ ४ फलंदाजांच्या मोबदरल्यात ५५६ धावांचा हिमालय उभा करुन आपला पहिला डाव घोषित केला. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडची ५ बाद १५७ अशी अवस्था करुन आॅसी संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
न्यूझीलंड संघ अजूनही तब्बल ३९९ धावांनी पिछाडीवर असून केन विलियम्स (नाबाद ५५) आणि बी. जे. वॉटलिंग (नाबाद १४) खेळपट्टीवर टिकून आहेत. याआधी २ बाद ३८९ या धावसंख्येवरुन सुरुवात करताना आॅसीने सामन्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. ख्वाजाने १०२ तर कर्णधार स्टीवन स्मिथ ४१ धावांवर खेळत होते. यावेळी सिम्थला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. तो वैयक्तिक ४८ धावांवर तंबूत परतला. यानंतर सर्व सुत्रे ख्वाजाने सांभाळली. यावेळी वोग्सने देखील ख्वाजा उपयुक्त साथ देताना आॅसीला पाचशेचा टप्पा पार करुन दिला. ख्वाजाने २३९ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार व २ षटकारांसह १७४ धावांची महत्त्वपुर्ण खेळी खेळली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : १३०.२ षटकांत ४ बाद ५५६ धावा - घोषित. (उस्मान ख्वाजा १७४, डेव्हीड वॉर्नर १६३, अॅडम वोग्स नाबाद ८३, जो बर्न्स ७१; टीम साऊथी १/७०, केन विलियम्स १/३९, जेम्स निशाम १/५०, टे्रंट बोल्ट १/१२७)
न्यूझीलंड (पहिला डाव) : ४५ षटकांत ५ बाद १५७ धावा (मार्टिन गुप्तिल २३, टॉम लॅथम ४७, केन विलियम्स खेळत आहे ५५, बी. जे. वॉटलिंग खेळत आहे १४; मिशेल स्टार्क २/३०, मिश्लेअ जॉन्सन २/५२; जोश हेजलवूड १/३३)