आॅस्ट्रेलिया संघ दाखल

By Admin | Updated: February 14, 2017 19:07 IST2017-02-14T00:13:04+5:302017-02-14T19:07:58+5:30

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियन संघाचे सोमवारी मुंबईत आगमन झाले. बॉर्डर-गावस्कर चषकासाठी भारत आणि आॅस्ट्रेलिया

Australia have teamed up | आॅस्ट्रेलिया संघ दाखल

आॅस्ट्रेलिया संघ दाखल

मुंबई : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियन संघाचे सोमवारी मुंबईत आगमन झाले. बॉर्डर-गावस्कर चषकासाठी भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील सलामी लढत २३ फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये खेळली जाणार आहे.
आॅस्ट्रेलिया संघ दुबई येथील सराव शिबिर आटोपल्यानंतर येथे दाखल झाला आहे. विमानतळाहून संघ थेट दक्षिण मुंबईतील हॉटेलसाठी रवाना झाला. आॅस्ट्रेलिया संघ ब्रेबोर्न स्टेडियममध्ये 16 ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भारत ‘अ’ संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. आॅस्ट्रेलिया संघ १५ फेब्रुवारी रोजी पहिल्या सराव सत्रात सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलिया संघ :
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, शॉन मार्श, पीटर हँड््सकाम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वॅड (यष्टिरक्षक), स्टीव्ह ओकीफी, मिशेल स्कार्ट, नॅथन लियोन, जोश हेजलवुड, एस्टन एगर, उस्मान ख्वाजा, जॅक्सन बर्ड, मिशेल स्वेपसन व ग्लेन मॅक्सवेल.

Web Title: Australia have teamed up