ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे सामना
By Admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:16+5:302014-08-25T21:40:16+5:30
ऑस्ट्रेलियाचे झिम्बाब्वेसमोर ३५१ धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे सामना
ऑ ्ट्रेलियाचे झिम्बाब्वेसमोर ३५१ धावांचे आव्हान तिरंगी मालिका : मार्श, मॅक्सवेल, फिंच यांची अर्धशतके हरारे : मिशेल मार्श (८९), ग्लेन मॅक्वेल (९३), ॲरोन फिंच (६७) यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात झिम्बाब्वेसमोर ३५१ धावांचे कठीण आव्हान उभे केले आहे़ तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्शने आपल्या खेळीत ८३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार आणि ४ षटकार लगावले़ मॅक्सवेलने केवळ ४५ चेंडूंना सामोरे जाताना ९ खणखणीत चौकार, ४ उत्तंुग षटकार लगावले़ या दोन्ही खेळाडूंनी वेगवान खेळी करताना अवघ्या ९ षटकांत चौथ्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारी केली़ ऑस्ट्रेलियाने अखेरच्या १० षटकांत तब्बल १४७ धावा कुटल्या़ झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस पाचारण केले़ ॲरोन फिंच (६७) अणि ब्रॅड हॅडीन (४६) यांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचताना संघाला मजबूत सुरुवात करून दिली़ दुखापतग्रस्त मायकल क्लार्कच्या जागी संघाचे कर्णधारपद भूषवणारा जॉर्ज बेली १४ धावा काढून बाद झाला़ झिम्बाब्वेकडून तेंदई चताराने ७७ धावांत २ गडी बाद केले़ जॉन एन, सिन विलियम्स, एल्टन चिगुंबरा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला़ अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा झिम्बाब्वेने २१़३ षटकांत ५ बाद ८८ धावा केल्या होत्या़ संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : ॲरोन फिंच ६७, ब्रॅड हॅडिन ४६, मिशेल मार्श ८९, ग्लेन मॅक्सवेल ९३़५० षटकांत एकूण ६ बाद ३५०़