पाकपुढे आॅस्ट्रेलियाचे आव्हान

By Admin | Updated: March 20, 2015 01:46 IST2015-03-20T01:46:38+5:302015-03-20T01:46:38+5:30

विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उद्या शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध आॅस्ट्रेलिया ही लढत होईल.

Australia challenge against Pak | पाकपुढे आॅस्ट्रेलियाचे आव्हान

पाकपुढे आॅस्ट्रेलियाचे आव्हान

अ‍ॅडिलेड : विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उद्या शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध आॅस्ट्रेलिया ही लढत होईल. घरच्या मैदानावर यजमान संघाला चारीमुंड्या चीत करण्याचे अवघड आव्हान पाकपुढे राहणार आहे.
सुरुवातीचे दोन्ही सामने गमविणाऱ्या पाकने नंतर ओळीने चार विजयांची नोंद केली. त्यात द. आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाला पराभवाची धूळ चारली होती. या विजयात कर्णधार मिस्बाह उल हकची फलंदाजी निर्णायक राहिली. २००५ साली आॅस्ट्रेलियाला पर्थमध्ये पाकने नमविले होते. तेव्हापासून आॅस्ट्रेलिया संघ पाककडून घरच्या मैदानावर पराभूत झालेला नाही.
पाक संघ आॅस्ट्रेलियाकडून गेल्या सात सामन्यांत पराभूत झाला आहे. पण, चमत्कार घडविण्यात पटाईत असलेल्या पाकला विजय साकार करायचा झाल्यास गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल.
विश्वचषकात उभय संघ आतापर्यंत आठ सामने खेळले. त्यात पाकने चार, तर आॅस्ट्रेलियाने चार सामन्यांत विजय मिळविले आहेत. २०११ च्या विश्वचषकात मात्र कोलंबोत झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकने आॅस्ट्रेलियाला पराभूत केले होते, हे विशेष. उद्याच्या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान खेळू शकणार नसल्याने पाकला धक्का बसला. तो जखमी आहे. त्याच्या अनुपस्थितीत वहाब रियाझ आणि सोहेल खान यांच्यावर मिस्बाहच्या आशा राहतील.



याशिवाय आयर्लंडविरुद्ध शतकी खेळी करणारा यष्टिरक्षक सर्फराज अहमद याच्याकडून पुन्ही अशी खेळी अपेक्षित आहे.
मिस्बाह म्हणाला,की माझ्या सहकाऱ्यांचे मनोबल उंचावलेले आहे. सलग चार विजयांमुळे संघात उत्साहाला उधाण आले. आम्ही विजयी वाटेवर असल्याने आमच्यापुढे कुठला संघ आहे, याच्याशी कर्तव्य नाही. आॅस्ट्रेलियाला कुणीही जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानत असल्याने त्यांना पराभूत केल्यास आमचा मोठा विजय मानला जाईल. पाक क्रिकेटसाठीदेखील हे शुभसंकेत ठरतील.
चार वेळेचा चॅम्पियन आॅस्ट्रेलिया मात्र सामन्यात वरचढ वाटतो. पण या स्पर्धेत त्यांची कामगिरी संमिश्र ठरली. लंका आणि इंग्लंडविरुद्ध या संघाने देखणी कामगिरी केली, पण सहयजमान न्यूझीलंडने त्यांचा पराभव केला होता. आॅस्ट्रेलियाचे कोच डेरेन लेहमन यांनी मात्र आपल्या संघाच्या यशाची खात्री असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले,‘‘येथून पुढे कुठलीही हयगय चालणार नाही. स्वाभाविक खेळाद्वारे सामने जिंकावेच लागतील. आमच्या खेळाडूंना लवकर सूर गवसतो, शिवाय कामगिरीतही ते झटपट सुधारणा करतात.’’ (वृत्तसंस्था)

इरफान चुकीच्यावेळी संघाबाहेर झाला. संघावर हा मोठा आघात आहे. इरफानचे जखमी होणे दुर्दैवी ठरले. तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तरीही त्याची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
- वकार युनूस, पाक कोच

पाकला हरविणे हे मोठे आव्हान आहे. त्यांचा दिवस असेल, तर ते कमालीचा खेळ करतात. पाक संघ धोकादायक असल्यामुळे त्यांना कमकुवत मानण्याची चूक आमच्या हातून घडणार नाही.
- शेन वाटसन, अष्टपैलू खेळाडू, आॅस्ट्रेलिया

हेड टू हेड
४आॅस्ट्रेलिया व पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ९२ एक दिवसीय लढती झाल्या आहेत. यामध्ये आॅस्ट्रेलियाने ५७ तर पाकिस्तानने ३१ वेळा विजय नोंदविला आहे. एक सामना टाय झाला असून तर ३ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.

४विश्वचषकामध्ये दोन्ही संघांमध्ये ८ लढती झाल्या आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी ४ सामने जिंकले आहेत.

Web Title: Australia challenge against Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.