शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CWG 2022:पदकांचे शतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाला ठरला पहिला देश; जाणून घ्या भारताची स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:07 IST

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये १०० पदक जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश ठरला आहे.

बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) ची खूप चर्चा रंगली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत यंदा देखील ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने अवघ्या क्रीडा विश्वाला आपलेसे केले आहे. मात्र यजमान देशातील खेळाडूंनाही मागे टाकत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक १०६ पदके जिंकली आहेत. तसेच यंदाच्या हंगामात पदकांचे शतक ठोकणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश ठरला आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आतापर्यंत सर्वाधिक ४२ सुवर्णपदक पटकावली आहेत. एवढेच नाही तर कांस्य पदक जिंकण्याच्या बाबतीत देखीला कांगारूचा देश अव्वल स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण ३२ कांस्यपदक जिंकली आहेत. तर रौप्य पदकाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असून देशाने आतापर्यंत एकूण ३२ रौप्य पदक मिळवली आहेत. 

दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत यजमान इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. इंग्लिश खेळाडूंनी आतापर्यंत ३१ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २१ कांस्य यांसह एकूण ८६ पदक पटकावली आहेत. तर पदक जिंकण्याच्या बाबतीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, न्यूझीलंडने या हंगामात आतापर्यंत २६ पदकांवर आपले नाव कोरले आहे. यामध्ये १३ सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारत सहाव्या क्रमांकावर भारतीय खेळाडूंनी देखील आपली प्रतिभा दाखवत इंग्लंडच्या भूमीवर तिरंगा फडकावला आहे. भारताने आतापर्यंत एकूण १३ पदक जिंकली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर स्थित आहे. भारताच्या खात्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांची नोंद आहे. भारताला आतापर्यंत वेटलिफ्टिंगमधून सर्वाधिक सात पदक मिळाली आहेत. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संकेत सरगरने भारतासाठी रौप्य पदक जिंकून पदकाचे खाते उघडले होते. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलियाEnglandइंग्लंडNew Zealandन्यूझीलंडGold medalसुवर्ण पदकSilverचांदी