शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आॅस्टे्रलियाने श्रीलंकेला नमवले

By admin | Published: May 27, 2017 12:38 AM

सलामीवीर अ‍ॅरोन फिंचचे शानदार शतक व ट्राविस हेडने केलेल नाबाद अर्धशतक याजोरावर बलाढ्य आॅस्टे्रलियाने

लंडन : सलामीवीर अ‍ॅरोन फिंचचे शानदार शतक व ट्राविस हेडने केलेल नाबाद अर्धशतक याजोरावर बलाढ्य आॅस्टे्रलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेचा २ विकेट्सने पराभव केला. लंकेने दिलेल्या ३१९ धावांचे भलेमोठे आव्हान आॅस्टे्रलियाने ८ फलंदाजांच्या मोबदल्यात २ चेंडू राखून पार केले. केनिंग्टन ओव्हल मैदानावर प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेतील अंडरडॉग श्रीलंकेने निर्धारीत ५० षटकात ७ बाद ३१८ धावांची मजबूत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्टे्रलियाचा डाव मध्यंतराला अडखळला. परंतु, सलामीवीर फिंचने सामना आॅस्टे्रलियाच्या बाजूने झुकवताना १०९ चेंडूत ११ चौकार व ६ षटकारांचा पाऊस पाडत तडाखेबंद १३७ धावांची खेळी केली. तसेच, मधल्या फळीतील हेडने फिंचला योग्य साथ देताना ७३ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ८५ धावा केल्या. दरम्यान डेव्हिड वॉर्नर, आयपीएल गाजवलेला ख्रिस लीन, मोइसेस हेन्रीक्स, ग्लेन मॅक्सवेल व मॅथ्यू वेड यांचे अपयश कांगारुंसाठी चिंतेची बाब ठरली. नुवान प्रदीपने ५७ धावांत ३ महत्त्वपुर्ण बळी घेत आॅस्टे्रलियाच्या फलंदाजीला हादरे दिले. लक्षण संदाकनने २ बळी घेतले. तत्पूर्वी, श्रीलंकाने संभाव्य विजेत्या आॅस्टे्रलियाला विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान देऊन प्रतिस्पर्धी संघांना एकप्रकारे इशाराच दिला. निरोशन डिकवेला - उपुल थरंगा यांनी ४९ धावांची सलामी दिल्यानंतर लंकेच्या फलंदाजीला गळती लागली. थरंगाच्या रुपाने लंकेचा पहिला बळी गेल्यानंतर ४३ धावांत झटपट ४ बळी गेले. यामुळे लंकेचा डाव ४ बाद ९२ धावा असा घसरला. यावेळी, चमारा कपुगेदेरा - कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांनी ६० धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी करुन लंकेचा डाव सावरला. ट्राविस हेडने आपल्याच गोलंदाजीवर कपुगेदेराचा झेल घेत आॅस्टे्रलियाला मोठे यश मिळवून दिले. कपुगेदेराने ३४ चेंडूत ४ चौकारांसह ३० धावांची खेळी केली. यावेळी लंकेचा डाव झटपट गुंडाळला जाणार अशी शक्यता होती. मात्र मॅथ्यूज व असेला गुणरत्ने यांनी मोक्याच्यावेळी दमदार अर्धशतक झळकावत संघाला ३००च्या पलीकडे नेले. मॅथ्यूजने १०६ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांसह ९५ धावांची निर्णायक खेळी केली. दुसरीकडे, गुणरत्नेने ५६ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७० धावांचा तडाखा दिला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकश्रीलंका : ५० षटकात ७ बाद ३१८ धावा (अँजेलो मॅथ्यूज ९५, असेला गुणरत्ने ७०, निरोशन डिकवेला ४१; मोइसेस हेन्रीक्स ३/४६) पराभूत वि. आॅस्टे्रलिया : ४९.४ षटकात ८ बाद ३१९ धावा (अ‍ॅरोन फिंच १३७, ट्राविस हेड ८५; नुवान प्रदीप ३/५७, लक्षण संदाकन २/६९)