आॅस्टे्रलियाने श्रीलंकेला नमवले

By admin | Published: May 27, 2017 12:38 AM2017-05-27T00:38:06+5:302017-05-27T00:38:06+5:30

सलामीवीर अ‍ॅरोन फिंचचे शानदार शतक व ट्राविस हेडने केलेल नाबाद अर्धशतक याजोरावर बलाढ्य आॅस्टे्रलियाने

Australia beat Sri Lanka | आॅस्टे्रलियाने श्रीलंकेला नमवले

आॅस्टे्रलियाने श्रीलंकेला नमवले

Next

लंडन : सलामीवीर अ‍ॅरोन फिंचचे शानदार शतक व ट्राविस हेडने केलेल नाबाद अर्धशतक याजोरावर बलाढ्य आॅस्टे्रलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेचा २ विकेट्सने पराभव केला. लंकेने दिलेल्या ३१९ धावांचे भलेमोठे आव्हान आॅस्टे्रलियाने ८ फलंदाजांच्या मोबदल्यात २ चेंडू राखून पार केले.
केनिंग्टन ओव्हल मैदानावर प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेतील अंडरडॉग श्रीलंकेने निर्धारीत ५० षटकात ७ बाद ३१८ धावांची मजबूत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्टे्रलियाचा डाव मध्यंतराला अडखळला. परंतु, सलामीवीर फिंचने सामना आॅस्टे्रलियाच्या बाजूने झुकवताना १०९ चेंडूत ११ चौकार व ६ षटकारांचा पाऊस पाडत तडाखेबंद १३७ धावांची खेळी केली. तसेच, मधल्या फळीतील हेडने फिंचला योग्य साथ देताना ७३ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ८५ धावा केल्या. दरम्यान डेव्हिड वॉर्नर, आयपीएल गाजवलेला ख्रिस लीन, मोइसेस हेन्रीक्स, ग्लेन मॅक्सवेल व मॅथ्यू वेड यांचे अपयश कांगारुंसाठी चिंतेची बाब ठरली. नुवान प्रदीपने ५७ धावांत ३ महत्त्वपुर्ण बळी घेत आॅस्टे्रलियाच्या फलंदाजीला हादरे दिले. लक्षण संदाकनने २ बळी घेतले.
तत्पूर्वी, श्रीलंकाने संभाव्य विजेत्या आॅस्टे्रलियाला विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान देऊन प्रतिस्पर्धी संघांना एकप्रकारे इशाराच दिला. निरोशन डिकवेला - उपुल थरंगा यांनी ४९ धावांची सलामी दिल्यानंतर लंकेच्या फलंदाजीला गळती लागली. थरंगाच्या रुपाने लंकेचा पहिला बळी गेल्यानंतर ४३ धावांत झटपट ४ बळी गेले. यामुळे लंकेचा डाव ४ बाद ९२ धावा असा घसरला. यावेळी, चमारा कपुगेदेरा - कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांनी ६० धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी करुन लंकेचा डाव सावरला.
ट्राविस हेडने आपल्याच गोलंदाजीवर कपुगेदेराचा झेल घेत आॅस्टे्रलियाला मोठे यश मिळवून दिले. कपुगेदेराने ३४ चेंडूत ४ चौकारांसह ३० धावांची खेळी केली. यावेळी लंकेचा डाव झटपट गुंडाळला जाणार अशी शक्यता होती. मात्र मॅथ्यूज व असेला गुणरत्ने यांनी मोक्याच्यावेळी दमदार अर्धशतक झळकावत संघाला ३००च्या पलीकडे नेले. मॅथ्यूजने १०६ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांसह ९५ धावांची निर्णायक खेळी केली. दुसरीकडे, गुणरत्नेने ५६ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७० धावांचा तडाखा दिला. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकात ७ बाद ३१८ धावा (अँजेलो मॅथ्यूज ९५, असेला गुणरत्ने ७०, निरोशन डिकवेला ४१; मोइसेस हेन्रीक्स ३/४६) पराभूत वि. आॅस्टे्रलिया : ४९.४ षटकात ८ बाद ३१९ धावा (अ‍ॅरोन फिंच १३७, ट्राविस हेड ८५; नुवान प्रदीप ३/५७, लक्षण संदाकन २/६९)

Web Title: Australia beat Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.