औरंगाबादच्या सिद्धांत मोरेला रौप्य पदक
By Admin | Updated: June 8, 2015 00:33 IST2015-06-08T00:33:05+5:302015-06-08T00:33:05+5:30
जपानच्या किताकेशू येथे सुरू असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान बलदंड शरीरसौष्ठवपटू सिद्धांत मोरे याने रविवारी रौप्यपदक जिंकले.

औरंगाबादच्या सिद्धांत मोरेला रौप्य पदक
औरंगाबाद : जपानच्या किताकेशू येथे सुरू असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान बलदंड शरीरसौष्ठवपटू सिद्धांत मोरे याने रविवारी रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारताला तीन रौप्य व एक कास्यपदक मिळाले.
आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा औरंगाबादचा पहिला शरीरसौष्ठवपटू म्हणून मान मिळवलेल्या सिद्धांत मोरे याने सीनियर गटात खेळताना पुरुष क्लासिक गटात रौप्यपदक जिंकले. सिद्धांत मोरे याच्याशिवाय जयसिंग आणि पी. समीर यांनीही आपापल्या गटात रौप्यपदक मिळवले. करुणा वाघमारेने कास्यपदक जिंकल्याची माहिती आशियाई शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव संजय मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.