मानांकन फेरीत अतनू दास चमकला
By Admin | Updated: August 6, 2016 03:42 IST2016-08-06T03:42:03+5:302016-08-06T03:42:03+5:30
भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची ठरली असून तिरंदाजी स्पर्धेच्या मानांकन फेरीत भारताच्या अतनू दासने ६४ खेळाडूंमधून ५ वे स्थान पटकावले

मानांकन फेरीत अतनू दास चमकला
रिओ : रिओ आॅलिम्पिकची सुरुवात भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची ठरली असून तिरंदाजी स्पर्धेच्या मानांकन फेरीत भारताच्या अतनू दासने ६४ खेळाडूंमधून ५ वे स्थान पटकावले. आता, यानंतर सुरु होणाऱ्या मुख्य स्पर्धेत अतनूला पाचवे मानांकन असेल. त्याचवेळी कोरियाच्या किम वूजिन याने अपेक्षित वर्चस्व राखताना तिरंदाजीच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक ७०० गुणांचा वेध घेत थेट जागतिक विक्रम नोंदवण्याचा पराक्रम केला.
यंदा तिरंदाजीमध्ये पुरुष गटात अतनूच्या रुपाने भारताचा एकमेव खेळाडू सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे अतनूने स्वत:ला पुरेपुर सिध्द करताना शानदार कामगिरी करीत ६८३ गुणांचा वेध घेत पाचवे स्थान पटकावले. मानांकन फेरीची सुरुवात २२ व्या स्थानावरुन करताना अतनूची सुरुवात खराब झाली. पहिले दोन नेम अवैध ठरल्यानंतर अतनुने शांतपणे कामगिरी करताना हळूहळी आपले मानांकन उंचावले. (वृत्तसंस्था)